मुख्य सामग्रीवर वगळा

विद्यापीठात हिंदी दिवस उत्साहात साजरा

नांदेड

माध्यमशास्त्र संकुलात हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ सचिन नरंगले हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. आनंदराज वर्मा, पत्रकार रविंद्रसिंघ मोदी, पत्रकार विलास आडे यांची उपस्थिती होती.
डॉ.आनंदराज वर्मा यांनी म्हटले हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे. हिंदी भाषेला विरोध करणार्‍यांची संख्या कमी नाही. दक्षिण भारतीय लोकांना तर हिंदी भाषेचे मोठे वावडे आहे. संत तुलसीदास, संत कबीर, मुंशी प्रेमचंद, गुलजार आदींनी हिंदी भाषेतील लेखन समृध्द करण्यासाठी फार मोठे योगदान राहिले आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामचे चिंतन यावेळी त्यांनी केले. पत्रकार मोदी यांनी पत्रकारांना किमान तीन भाषा अवगत असायला पाहिजे. पत्रकारांनी प्रत्येक बातमीसाठी संयम ठेवायला पाहिजे. जाणीवपूर्वक कोणत्याही व्यक्तीला अपमानीत करण्यासाठी लेखन करू नये, शैक्षणिक बातम्या लिहिले पाहिजे, सद्या शिक्षणांच्या बराच समस्या होत आहेत. आश्रमशाळा बंद पडल्यांच्या मार्गावर आहेत. त्यासाठी पत्रकारांनी यांचेवरती संशोधन करण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पत्रकार आडे यांनी म्हटले की, पत्रकारांनी हिंदी भाषेमध्ये पत्रकारिता ही काळाची गरज आहे. कारण वेगवेगळया राज्यांमध्ये काय होत आहे. हे फक्त हिंदी भाषेतून प्रकाशित होणार्‍या वृत्तपत्राततून वाचयाल्या मिळते. त्यांनी आपले अनुभव व्यक्त केले. पत्रकारिता ही एक सेवा आहे. पण आज पत्रकार या पत्रकारितेकडे व्यवसायाच्या दृष्टीने काम करत आहेत. त्यामुळे समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या बातम्या प्रकाशित होत नाहीत, यामुळे समाजाला योग्य न्याय मिळत नाही.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ . कैलाश यादव यांनी केले व्यक्ती परिचय अनुजा बोकारे तर प्रियांका नरवाडे ने उपस्थितांचे आभार मानले याप्रसंगी  माध्यम संकुलाचे डॉ. सचिन नरंगले, डॉ. राजेंद्र गोणारकर , सुहास पाठक, डॉ. संपत पिंपळे, शंकर हंबर्डे बबन हिंगे व  विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

टिप्पण्या