मुख्य सामग्रीवर वगळा

राणीसावरगांव सरपंचपदी सोमनाथ कुदमुळे यांची बिनविरोध निवड

राणीसावरगावच्या सरपंचपदी सोमनाथ कुदमुळे यांची बिनविरोध निवड....
राणीसावरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी दि.18/8/ रोजी विशेष सभा घेण्यात आली यावेळी सरपंच निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली.यावेळी सरपंच पदासाठी सोमनाथ कुदमुळे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे सरपंच म्हणून श्री सोमनाथ शंकरआप्पा कुदमुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी आध्यासी अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी पी.एम.सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. ग्राम विकास अधिकारी एस.बी.तिडके व एकुण सतरा सदस्य यावेळेस उपस्थित होते.
राणीसावरगाव विकास आघाडी कडून रेणुकादेवी मंदिराजवळील दत्त मंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माजी सरपंच स.अकबर शेठ, बालासाहेब मुंडे,श्री बाळासाहेब किरवले (जि.प.सदस्य बीड), विश्वनाथआप्पा सोळंके (जि.प.सदस्य), गंगाधर मस्के (सरपंच चाटोरी), पं.स.सदस्य दत्ता जाधव, सय्यद अल्ताफ,मधुकरराव जाधव,प्रदिप जाधव,रमेश कुलकर्णी , औंकर आंधळे आदींच्या उपस्थितीत नुतन सरपंच सोमनाथ कुदमुळे यांचा सत्कार करून माजी सरपंच प्रा.पी.एल.राठोड यांचा गावकऱ्यांकडुन सत्कार करून निरोप देण्यात आला.
शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी पिंपळदरी पोलीस स्टेशन कडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टिप्पण्या