शिक्षक दिनी श्री कल्याणी व निर्मला पाचंगे यांचा ग्रामस्थाकडुन गौरव.....!
राणीसावरगाव येथील जि.प.कें.प्रा.शाळेत शिक्षक दिन साजरा...
राणीसावरगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक म्हणून गुंजेगाव येथील जि.प. प्रा.शाळेत कार्यरत असलेले सहशिक्षक श्री संजय कल्याणी यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची दुसरीच्या वर्गातील अनाथ मुलगी दत्तक घेऊन तिच्या पुढील शिक्षणाचा खर्च उचलत आहेत. सहशिक्षिका श्रीमती निर्मला पाचंगे यांनी विशेष मेहनत घेऊन खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना घडविण्यात मोलाचे योगदान देतात म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात त्यांचा ग्रामस्थाकडुन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.यावेळी केंद्रीय शाळेत मुख्याध्यापक असलेले महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण जाधव यांनी शाळेच्या भौतिक सोयी सुविधासह शाळेचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विशेष प्रयत्न करीत शाळेला डिजीटल शाळा केले असून शिक्षकांनी आता खेड्यापाड्यातील विद्यार्थी घडला पाहीजे यासाठी परिश्रम घेण्याची गरज असून जिल्हा परिषदेच्या शाळांनी आता गुणवत्तेवर भर द्यायला हवा असे मत मत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार रमेश महामुने हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार ज्ञानेश्वर जाधव, संजय रायबोले, मुख्याध्यापक नारायण जाधव, राम नरवड, संजय कल्याणी, निर्मला पाचंगे, एस.व्ही गाढवे, ढाकणे, बिराजदार,लांडगे, श्रीमती बुजरूग, सोळंके,पवार , गाडेताई आदीजण उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक जाधव यांनीकेले तर कार्यक्रमाचे संचालन श्री बिराजदार यांनी केले.
टिप्पण्या