मुख्य सामग्रीवर वगळा

केळझरचा सर्वांगीण विकास करू -अमृता फडणवीस

वर्धा, दि 1  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केळझर हे गाव दत्तक घेतल्यामुळे हा गावाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी शासनाची असून यामध्ये जनतेने आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन अमृता फडणवीस यांनी केले. केळझर येथे गावकऱ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. 
           गावात जलशुद्धीकरण सयंत्र बसविण्यात आले आहे .याच्या माध्यमातून गावकाऱ्याना शुद्ध पाणी अतिशय स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे.यामुळे गावक-यांचे  आरोग्य चांगले राहण्यासोबतच आजाराचे प्रमाण कमी होईल. तसेच स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत  गावातील कचरा गोळा करण्यासाठी वाहन देण्यात आले आहे.गावक-यांनी  स्वत:चे गाव स्वच्छ ठेवण्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
गावातील नागरिकांनी त्यांना कोणकोणती विकास  कामे गावात करावयाची आहेत याचे नियोजन करावे.ती सर्व कामे गावात करण्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल अशी हमीही त्यांनी याप्रसंगी गावकऱ्याना दिली.
श्रीमती फडणवीस यांनी यावेळी केळझरच्या गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. श्रीमती फडणवीस यांनी कंपनी सामाजीक बांधिलकी निधीतून  गावात बसविण्यात आलेल्या जलशुद्धीकरण सयंत्राचे तसेच कचरा गोळा करण्यासाठी देण्यात आलेले वाहनाचे लोकार्पण केले.
याप्रसंगी  त्यांचे सोबत खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या