तलावातील उपलब्ध पाणीसाठा राखीव ठेवण्याची मागणी..!
राणीसावरगाव येथील कागणेवाडी पाझर तलावातून शेतकऱ्यांकडून वीजपंपाद्वारे करण्यात येणारा अवैध पाणी उपसा थांबवून तलावात उपलब्ध पाणीसाठा टंचाई काळात पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात यावा अशी मागणी सरपंच सोमनाथ कुदमुळे यांनी तहसिलदार गंगाखेड यांच्याकडे केली आहे.
राणीसावरगाव सह कागणेवाडी, घाटेवाडी, चिखलीतांडा,केदारेश्वर तांडा, पालम तालुक्यातील मार्तंडवाडी, पोखर्णी देवी, आदी जवळपास दहा ते पंधरा गावाच्या पाणी पुरवठा योजनेचा मुख्य स्त्रोत असलेला कागणेवाडी पाझर तलावात यावर्षी पाणी पातळीत वाढ झालेली नाही. तरी देखील परिसरातील शेतकरी वीजपंपाच्या सहाय्याने शेतीसाठी पाणी उपसा करीत आहेत. तलावात पाणीसाठा नसल्यामुळे गतवर्षीचा शिल्लक असलेला पाणी साठा भविष्यात निर्माण होणाऱ्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कामी येणार असल्याने भविष्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन करून आरक्षित करण्यात यावा अशी गावकऱ्यांकडुन एकमुखी मागणी असल्यामुळे सरपंच सोमनाथ कुदमुळे याचासह स.अल्ताफ स.अकबरसेठ,मधूकर जाधव , रमेश कुलकर्णी , औंकर आंधळे , दत्ता जाधव ,माजी सरपंच प्रा.पी.एल.राठोड , सुरेश चव्हाण , धनंजय जाधव , माधव राठोड , महारूद्र बेंबळगे , संजय रायबोले , यांनी याबाबतीत निवेदन देऊन तहसीलदार गंगाखेड यांना पाणी साठा राखीव ठेवण्याची मागणी केली आहे.
टिप्पण्या