जय भगवान ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय
डोलखेड( प्रतिनिधी ) जालना जिल्ह्य़ातील डोलखेड खुर्द) येथील भगवान ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार श्री.गजानन लिंबाजी बनकर यांचा प्रचंड बहुमतानी विजय झाला आहे. त़्याच्या प्रतिस्पर्धी यांना पराभुत करून त्यांनी बहुमतांनी विजय मिळवला.तसेच त्यांच्या सोबत असलेले पॅनलचे देविदास डोईफोडे शिवाजी डोईफोडे गिता डोईफोडे ,गजानन डोईफोडे ,इंदुताई डोईफोडे, रेणुका डोईफोडे सरस्वती डोईफोडे या सातही सदस्यांचा विजय झाला.
विजया नंतर महासंवाद न्युजशी बोलताना नवनिर्वाचित सरपंच गजानन बनकर त्यांनी हा विजय गावातील जनतेला व कार्यकत्यांनी घेतलेल्या मेहनतीला अर्पित केला व ‘सबका साथ, सबका विकास नारा देत त्यांनी पुढील विकास कामांना चलना देणार आहोत. गावाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन कामे करण्यात येणार आहेत.गावातील जनतेने मिळवुन दिलेला हा विजय गावाच्या विकासासाठीच आहे असही त्यांनी प्रतिपादन केले .
टिप्पण्या