निकृष्ट रस्त्याची चोकशी करा :-सोमनाथ कुदमुळे
राणीसावरगाव { प्रतिनिधी } श्री रेणुकादेवी तिर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी तिर्थक्षेत्र विकास निधीतून एक कोटी रुपय खर्चून श्री रेणुकादेवी कमान ते देवी मंदिरापर्यत रस्ता करण्यात आला आहे तो रस्ता निकृष्ट दर्जाचा करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कार्यवाही करण्याची मागणी सरपंच सोमनाथ कुदमुळे यानी केली आहे . राणीसावरगाव मधील मुख्य रस्ता असल्याने प्रवाशी अधिक प्रमाणात याच रस्त्यावरून ये-जा करत आसतात त्यामुळे हा रस्ता चांगल्या दर्जाचा व्हावा अशी अपेक्षा होती मात्र रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.त्या कामाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे
............
गंगाखेड- राणीसावरगांव रस्ता तात्काळ दुरुस्त करा :-सरपंच
गंगाखेड- राणीसावरगांव रास्ता दुरुस्त करण्यासाठी राणीसावरगांव विकास संघर्ष समितीने पुकारलेल्या आंदोलनात जनतेसोबत असून तात्काळ रास्ता दुरुस्त न झाल्यास वेळप्रसंगी जनतेसह रस्त्यावर उतरू असे मत सरपंच सोमनाथ कुदमुळे यांनी पुण्यनगरीशी बोलताना व्यक्त केले आहे
टिप्पण्या