मुख्य सामग्रीवर वगळा

रस्ता दुरुस्त करण्यासाठी क्रांतिसेनाचे निवेदन....

क्रांतीसेनाच्या वतीने गंगाखेड राणीसावरगांव रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार बल्लापट्टे यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गंगाखेड ते राणीसावरगांव रस्त्यावर जागो जागी मोठ मोठे खड्डे पडले असुन त्यामुळे अनेक प्रकारचे अपघात झाले आहेत. त्यात काही लोकांचा सदरील खड्यामुळे मृत्यु ही झाला आहे. इळेगांव, बोथी, खंडाळी रोकडोबा, खंडाळी तांडा, इसाद, इसाद तांडा येथील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी ये जा करतात परंतु सदर खड्यामुळे गाडी चालकांना गाडी चालवतांना अनेक समस्या येत आहेत त्यामुळे राणीसावरगाव ते गंगाखेड हा केवळ अर्धातासाचा रस्ता असतांना ही या खड्यामुळे जवळपास 1 ते 1. 5 तास येवडा वेळ लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातच आहे. हे विद्यार्थी ऊद्याच्या सुंदर, निरोगी, भ्रष्टाचार मुक्त व कार्यक्षम भारताचे भविष्य आहेत परंतु त्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे तसेच प्रमुख बाजार पेठ गंगाखेड - राणीसावरगांव कडे अनेक स्त्री-पुरुष तसेच वृध्द व्यक्ती ये - जा करतात. त्यांना सदर खड्यामुळे अनेक प्रकारचे आजार त्यात प्रामुख्याने मणक्याचे आजार होत असुन गरोदर महिलांना उपजिल्हा रुग्णालया पर्यंत पोहचने ही आवघड झाले आहे. बर्याच महिला उपजिल्हा रुग्णालया पर्यंत पोहचण्या अगोदरच बाळंत होत आहेत. त्यामुळे त्यांना अनेक समस्या निर्माण होत आहेत. खंडाळी रोकडोबा ते राणीसावरगांव हा केवळ 6 कि. मी. चा रस्ता पुर्ण पणे उखडलेला आहे.पावसाची झुळूक ही आली तर हा रस्ता चिखलाणी माखुन जातो. रस्त्यावर चालणेही अवघड होते. तेव्हा आपण सदर रस्त्याची दुरावस्था जायमोक्यावर येवुन बघावी व सदरील रस्ता त्वरीत दुरूस्त करावा असे निवेदनात म्हटले आहे क्रांतीसेने चे तालुका अध्यक्ष विष्णुदास शिवाजीराव भोसले, तालुका सरचिटनीस जयश्री ताई शिंदे, पालम तालुका संपर्क प्रमुख अंगदराव शिंदे, पिटलेवाड किशन मारोती सुपा शाखा अध्यक्ष विद्यार्थी अघाडी,निवृत्ती गायकवाड मालेवाडीकर, नरेंद्र भालेराव इसादकर, वैजनाथ शाहेबराव भोसले खंडाळीकर, मुक्तीराम शिंदे, मोतीराम पवार,गायनाचार्य सुरमनी आचुत महाराज भोसले, तुकाराम भोसले, लक्ष्मन भोसले, मारोती पवार, सुधाकर पवार, गणेश भोसले, श्रीरंग पवार, बालासाहेब भोसले, सिध्देश्वर गिरी, भागवत भोसले, नवनाथ भोसले, भगवान भोसले, विठ्ठल कोल्हे, बंडू शिंदे, रोहिदास मोरचाटे, निव्रृती भोसले, ज्ञानोबा खटिंग, बाबाराव भोसले, पांडुरंग भोसले, शरद कोल्हे, सतीश भोसले, महेश भोसले, उध्दव भोसले अदींनी तहसील प्रशासनास निवेदना द्वारे कळविले आहे.

टिप्पण्या