मुख्य सामग्रीवर वगळा

संबंधितावर गुन्हे दाखल करणार..शिक्षणधिकारी कुंडगीर


विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचा पेपर फुटला
संबळ पुरावे शिक्षण विभागाला सादर
संबंधितावर गुन्हे दाखल करणार..शिक्षणधिकारी कुंडगीर
राणीसावरगाव (प्रतिनिधी)गंगाखेड तालुक्यातील राणीसावर गाव येथिल 10 वीचे परीक्षा केंद्रावर दि 16 मार्च रोजी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचा पेपर परीक्षेच्या अर्धा तासाआधीच व्हाट्सएपच्या सहायाने व्हायरल करण्यात आला परीक्षा सुरू झाल्यापासून अर्धा तास अगोदर प्रश्नपत्रिका कुटून फुटते यासाठी स्थानिक पत्रकारानी जाणून घेतले असता सबळपुराव्यानिशी व्हायरल झालेला विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचा पेपर व तो पेपर कोणाकडून उपलब्ध झाला याच्या मोबाईल स्क्रिनपिचर व अधिक माहिती शिक्षण सभापती भावणताई नखाते यांना तात्काळ पाठवल्यानंतर त्यानी शिक्षण विभागाच्या यंत्रणेशी वरीलबाबत माहिती देऊन संबंधितांवर कार्यवाही करण्याचे संकेत दिले त्यावेळी शिक्षणधिकारी बी.आर कुंडगिर यांच्याशी संपर्क साधला असता संबंधितांवर कार्यवाही करणार असल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले आहे.परंतु उशिरा पर्यंत कार्यवाही ची प्रक्रिया पूर्ण न झाल्याचे समजते.कार्यवाही झालीतर मोबाईल व्हाट्सएपद्वारे प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या रॉकेटचा भांडाफोड होणार आहे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना चपराक बसेन याप्रकरणी संस्थाचालक व परीक्षा यंत्रणेचे लागेबांधे असल्याचे बोलल्या जात आहे मुळात शिक्षण क्षेत्रात असे गैर प्रकार होत असतील  व त्याला खतपाणी घालणाऱ्या वर वेळीच कार्यवाही होणे गरजेचे असताना शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे 10 वीच्या परीक्षेत कॉप्या सारखे गैरप्रकार वाढले आहेत अश्या संतप्त प्रतिक्रिया समान्यतून प्रकट होताना दिसत आहेत


टिप्पण्या