मुख्य सामग्रीवर वगळा

* गंगाखेडशी 21 गावच्या रहिवाशांचा तुटला संपर्क माती बंधारा गेला वाहून ...

* गंगाखेडशी 21 गावच्या रहिवाशांचा तुटला संपर्क
माती बंधारा गेला वाहून ...

* आनेक दशकापासूनची नागरिकांची पक्या बंधाऱ्याची मागणी पूर्ण होईना

* निवडणूकीच्या तोंडावरच लबाड पुढारी देतात आश्वासने

गंगाखेड(भागवत जलाले = पत्रकार) जगात जर्मनी आणि भारतात परभणी आणि परभणी जिल्हातील मोठा तालुका म्हणून ओळखले जाणारे गंगाखेड .
गोदावरी नदी च्या काठावर वसलेले हे शहर आणि संत जनाबाईंचे जन्म गाव.
या शहरात अनेक उद्योग धंदे तर आहेच पण जिल्ह्यानंतरची सर्वात मोठी व्यापार पेठ ही गंगाखेड येथे आहे.
येवढेच काय तर जिल्हा उपरूगणालया सह आनेख मोठ मोठी खाजगी दवाखाने व शैक्षणिक संस्था,तसेच सर्व शासकीय कार्यालये ही गंगाखेड मध्ये आहे.
मग गंगाखेड सर्वच आजूबाजूच्या गावांसाठी किती महत्वाचे ठिकाण आहे हे या वरून लक्षात येते.
पण गोदावरी नदीच्या पलीकडे आसलेली ऐकून  21 गावे मात्र पुर्ण पावसाळा आसे परेंत नदी पात्रातून बंधारा नसल्यामुळे  गंगाखेड ला आपली वाहने घेऊन येउच शकत नाहीत आणि जर आलेच तर गंगाखेड ते धारखेड फक्त आर्धा किलोमीटर चा आंतर त्यांना 15 ते 20 किलोमीटर लांबून हेलपाटा मारून  यावे लागते आणि आशी 21 गावे  धारखेड,मुळी,नागठाणा,सुनेगांव,सायाळा,अंगलगांव,धसाडी,माळसोना,खरबडा,वजूर,दगडवाडी,लिमला,ठोळा,दामपुरी,
बामणी,आंबेटाकळी,पोरवड,रेणकापुर,लोहगाव,देवठाणा,
देऊळगांव आदी सर्व गावातील लोकांना बंधाऱ्या आभावी हाल आपेष्टा सहन कराव्या लागतात.
विद्यार्थी,कर्मचारी, व्यापारी  यांना तर रोजच बंधाऱ्या आभावी जवळचा मार्ग सोडून हेलपाटा मारून यावे लागते.
वरील गावांची आनेख दशका पासुन पक्या बंधाऱ्याची मागणी होत आहे पण यांची दखल घेतली जात नाही.
निवडणुकीच्या तोंडावर आश्वासने दिली जातात परंतु पक्का बंधारा कोणीही बांधून देत नसुन सर्व आश्वासन देणारे लबाड पुढारी आसल्याचे या गावांचे नागरिक बोलून दाखवत आहेत.
तर दर वर्षी गंगाखेड नगर परिषद या गावांना ये जा करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून तात्पुरता माती बंधारा बनवते पण पहिल्याच पावसात हा माती बंधारी रस्ता पाण्यात वाहून जातो आणि लाखो रुपये ही.
कांही लोकांनी तर या आनेख वर्षाच्या कच्या बंधाऱ्याच्या खर्च्यात पक्का बंधारा बनून गेला आसता आसे ही बोलुन दाखवले आहे.
तर या वरील सर्व गावकऱ्यांची पक्या बंधाऱ्याची मागणी केंव्हा पुर्ण होईल या कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
या प्रश्नाला मार्गी लावतो आणि तुमचा कायमचा पक्का बंधारा बांधून रस्त्याचा प्रश्न सोडवतो आसे म्हणून आनेख पुढाऱ्यांनी सत्ता भोगल्या हे मात्र खरे आहे.
तरी वरील सर्व गावांतील गावकऱ्यांची पक्या बंधाऱ्याची मागणी होत आहे. ........

टिप्पण्या