मुख्य सामग्रीवर वगळा

स्टेप बाय स्टेप क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांची गोळ्या घालून हत्या .

लातुरातील स्टेप बाय स्टेप कलासचे संचालक अविनाश चव्हाण यांचा खून झाला आहे . रात्री एक वाजता ते आपल्या घराकडे जात असताना शिवाजी शाळे जवळ त्याच्या गाडीवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या . यात एक गोळी त्याच्या उजव्या छातीत लागण्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.गाडीची चालकाच्या बाजूची काच गोळीबारात फुटली होती . अविनाश चव्हाण स्वताच गाडी चालवत होते .यावेळी गाडी ते एकटेच होते .त्याच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या . हल्लेखोर या ठिकाणी दबा धरून बसला होता का त्याचा पाठलाग करत होता हे अद्याप स्पष्ट झाले नाही .या घटनेची माहिती मिळताच लातूरचे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड .डीवायएसपी हिम्मत जाधव ,डीवायएसपी गणेश किंद्रे,स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय सुधाकर बावकर ,पीआय केशव लटपटे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी हजर होते .. लातूर हे शैक्षणिक क्षेत्रात नावारूपाला आले आहे. यामुळे येथे मोठ्याप्रमाणात खासगी शिकवणी वर्ग हि चालतात. मागील काही वर्षात येथे अविनाश चव्हाण यांचे स्टेप बाय स्टेप या क्लास नावारूपाला आले होते . काही दिवसापूर्वी त्यांनी एक कोटीचे बक्षीस क्लास मधील मुलांना दिले होते . पुढील वर्षी यापेक्षा दुप्पट बक्षीस वाटणार होते. नांदेड येथे हि आपली ब्रँच सूरु केली होती.या घटनेची माहिती येथील शैक्षणिक क्षेत्रात कळताच हळहळ  केली जात. ह्या घटनेची माहिती मध्यरात्री सर्व शहरात वार्यासारखी पसरली आणि अनेक जणांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.अतिशय उच्च्भ्रू लोकवस्ती असलेल्या भागात हि हत्या झाली आहे. पोलीस आता पुढील तपास करत आहेत.नेमके हत्येचे कारण याचा शोध पोलीस घेत आहेत. मृतदेह पोस्टमार्टम साठी सरकारी दवाखाण्यात पाठविण्यात आला आहे.

टिप्पण्या