
हिंगोली, 15 जुलैः हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील 50 ते 60 गावांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. आग ओकणाऱ्या एप्रिल आणि मे महिन्याच्या गरमीत रामवाडी गावच्या जनतेने अथक मेहनत घेतली. पुर्ण रामवाडी गावाने पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा जिंकण्यासाठी घाम गाळला. यातही स्पर्धा जिंकण्यापेक्षा दुष्काळी गावात पाणी येणार ही भावना जास्त प्रखर होती. त्यांच्या कष्टावर वरुण देवता प्रसन्न झाला आणि पाहता पाहता हे गाव सुजलाम सुफलाम झाले.गावातले तलाव आता तुडूंब भरून वाहत आहेत. आधी पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक मैल चालत जावं लागायचं. पण आता मात्र कपडे धुण्यासाठीही गावाच्या बाहेर जाण्याची गरज नाही. मागील वर्षी पाणी नसल्याने रब्बी हंगाम घेता आला नव्हता.. खरीप पिकानंतर कोणतंही पीक घेणं शक्य नव्हतं मात्र आता रब्बी पीकासोबतच गव्हाची शेतीसुद्धा करण्याचा शेतकऱ्यांनी निर्धार केला आहे. मागील वर्षी पाणी नसल्याने रब्बी हंगाम घेता आला नव्हता.. खरीप पिकानंतर कोणतंही पीक घेणं शक्य नव्हतं मात्र आता रब्बी पीकासोबतच गव्हाची शेतीसुद्धा करण्याचा शेतकऱ्यांनी निर्धार केला आहे.पुर्वी माणसाला काय पण प्राण्यांनादेखील पाणी प्यायला उपलब्ध नव्हते. पण आता गावाजवळच सीसीटी आणि तलाव झाल्याने गुराढोरांच्या आणि माणसांच्या पिण्याचा प्रश्न मिटला आहे. चिंचोरडी गाव डोंगराळ भागात असल्याने या भागातदेखील नेहमी पाणी टंचाई असायची हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करत जावं लागत होत. जेवण मिळत नव्हते तर गुरांना पाणी प्यायला मिळत नव्हते. आता मात्र गावातील बोरला मुबलक पाणी आलं आहे. याशिवाय पाण्यासाठी होणारी भांडणदेखील आता होत नसल्याचे महिला सांगतात
टिप्पण्या