मुख्य सामग्रीवर वगळा

आगामी निवडणुकात बसपाला साथ द्या - व्ही.डी.काळे

 प्रतिनिधी : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत देशातील बहुजनांनी एस.सी., एस.टी च्या सोबत येत मायावती यांना प्रधानमंत्री करण्यासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून यावेत असे आवाहन केंद्रीय कार्यकारी सदस्य व्ही.डी.काळे यांनी गंगाखेड येथे आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात केले.
     बहुजन समाज पार्टीच्या गंगाखेड विधानसभा युनिटच्या वतीने एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर, गुणवंत विध्यार्थी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन दि. १५ जुलै रोजी शहरातील आनंद फंक्शन हॉल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास जंगले, प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्ही.डी.काळे व प्रमुख पाहुणे म्हणून बसपा प्रदेश सचिव  देवराव खंदारे, विभाग प्रमुख प्रा. शामसुंदर वाघमारे, बामसेफचे संजय हनवते, भीमराव जोंधळे, विश्वजित वाघमारे, विधानसभा प्रमुख चंद्रशेखर साळवे, प्रसेनजीत मस्के, प्रकाश गवई आदि उपस्थित होते.
     यावेळी १० वी १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवातील उत्कृष्ठ जयंती समितीचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात पक्षातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये गंगाखेड शहराध्यक्षपदी विशाल प्रभाकर साळवे,  पालम शहराध्यक्षपदी बालासाहेब शिंदे, उपध्यक्ष संभाजी घोरपडे, शहर सचिव बबलू हनवते यांची निवड करण्यात आली यावेळी पुढे बोलतांना काळे म्हणाले कि, सध्या देशात एस.सी., एस. टी, ओ.बी.सी. व अल्पसंख्यांक यांच्या विरोधी वातावरण निर्माण झाले आहे देशातील सर्व समाजाला न्याय देण्याचे काम फक्त बहन मायावतीच करू शकतात म्हणून महाराष्ट्रातून बसपाचे जास्तीत खासदार निवडून देऊन त्यांना प्रधानमंत्री करण्यास हातभार लावावा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार जिल्हा प्रभारी शिवराज पैठणे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सुरेश उबाळे, दीपक सावंत, धम्मानंद हनवते, राहुल मस्के, सुनील खंदारे, गोपीनाथ भालेराव, गोपीनाथ सावंत, संतोष गिराम, नवनाथ साळवे, विकास देवकते, कल्याण साळवे, दामोधर जोंधळे, आनंद शिंदे हरिभाऊ साळवे, सचिन साळवे, बापू सावंत आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या