मुख्य सामग्रीवर वगळा

शहर_औद्योगिक_वसाहतींच्या_भागातील मुली सैराट होण्याचे प्रकार वाढले

 शहर व परिसरातून बेपत्ता झालेल्या व्यक्‍तींच्या यादीत मागील एका महिन्यात 27 जणांचा समावेश असून यात 16 तरूणीचा समावेश आहे. मागिल महिन्यात विविध पोलिस ठाण्यात करण्यात आलेल्या नोंदणीत तीन महिलांनी पलायन केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. शहर तसेच औद्योगिक वसाहतींच्या भागात  घरातून कोणालाही न सांगता पलायन करणार्‍यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा विविध घटना घडण्यामागे त्या व्यक्‍तीची मनोविकृती तसेच आमिषाचे बळी अथवा विवाहपूर्व प्रेमसंबंध याबाबी कारणीभूत ठरत असतात, असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

औरंगाबाद शहरात पाच ते सहा आद्योगीक क्षेत्र आहेत. त्यामध्ये वाळूज पंढरपूर सर्वात मोठे आहे. त्या ठिकाणी 50हून अधिक कंपन्या आहेत, त्यामुळे सहाजिकच मोठ्या प्रमाणात कामगारांची संख्या आहे. मराठवाड्यातीलच नव्हे तर तर उत्‍तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, गुजरातसह आदी राज्यातील लोक येथे कामानिमित्‍त वास्तव्यास आहेत. बाहेरील राज्यातील लोक वाळूज पंढरपूर येथील औद्योगीक वसाहतील आपल्या कुटुंबासह राहतात. ते सरासरी अवजड काम कंपनीत करीत असतात. त्यामुळे असे कामगार आपल्या कुटुंबाकडे कमीत कमी लक्ष देत असतात. 12 तासांहून अधीक काम ते कंपनीत करीत असतात, कारण त्यांना येथील घराच्या खर्चासह आई वडीलांना आर्थीक मदत करावी लागते. अशात दोन मुले आणि पत्नीचा साभाळ करावा लागतो. मुलांच्या शिक्षणाकडे तर त्यांचे साफ दुर्लक्ष असते, त्यातुनच अनर्थ घडत असतात. पोलिस दप्‍तरी मागील काही दिवसांत नोंद झालेल्या तक्रारीत, मुलगी शाळेत जातो म्हणून घराबाहेर पडली ती घरीच परत आली नाही. अशा बहुसंख्य तक्रारी येत असतात. कारण असते ते म्हणजे आई वडिलाचे मुलांकडे दुर्लक्ष. मुले काय करत आहेत, काय नाही यांचा अशा लोकांना काही एक माहिती नसते. काही जणांची मुले आई वडीलांच्या दुर्लक्षामुळे आपल्या मनात येईल ते करीत असतात. तर काही आजूबाजूचे राहणीमान बघून, त्यांंच्या सारखे राहण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यात ते हरखून जात असतना, त्यांना कदापी आपली काय परिस्थिती आहे याचे कदापी भान राहत नाही. लहान लहान मुली (प्रेम) या सुंदर शब्दाचा गैर अर्थ  काढून कोणाच्या तरी प्रेमात पडतात. काही दिवस या भानगडीत राहून आई वडीलाचा काही एक न विचार करता घर सोडून जातात. त्यांची  वाट पहावून हताश झालेले, आई वडील जवळील पोलिस ठाणे गाठून बेपत्‍ता झाल्याची तक्रार देतात. काही दिवसांनी तीच मुलगी दारात येऊन थांबते, त्यावेळस आई वडील देखील चक्रावून जातात की तू कुठे होतीस आणि कशी आलीस. त्यावेळी मुलीकडून जे उत्‍तर मिळते, त्यावर दोघेही गप्प बसतात. या घटनेला फक्‍त जबाबदार आहे तो म्हणजे पालकांचा दुर्लक्षपणा. या ्रबाबत आम्ही ज्येष्ठ नागरिकांना विचारणा केली असता, त्यांच्या मते कौटुंबिक कलह, वाद, अनैतिक संबंध तसेच मनोविकृती अशा असंख्य बाबी बेपता होण्यामागे कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. वाढत्या पलायनामुळे संसार देखिल उद‍्धवस्त होण्याचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे. महिलांमध्ये यात वाढते प्रमाण हि चिंतेची बाब असून त्या स्वतः सोबतच आपल्या मुलांना देखिल सोबत घेऊन जातात. या सर्व घडणार्‍या घटनेत त्या व्यक्‍तीचे मानसिक आरोग्य तसेच त्याचा हेतू यावर सर्व बाबी अवलंबून राहतात.

टिप्पण्या