मनपा प्रशासनाने मांडला स्टेडियम व्यापाNयांचा छळ
-प्रशासनाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष ; सोयीसुविधांचा अभाव
परभणी, दि. १३ (प्रतिनिधी)- येथील स्टेडियमधील व्यापाNयांचा मनपा प्रशासनाने अक्षरश: छळ मांडला आहे. वारंवार निवेदने, तक्रारी, अर्ज देऊनही स्टेडियम दुकानासमोरील दुर्गंधीयुक्त घाण पाणी हटविल्या जात नाही. यामुळे अनेक व्यापाNयांचा व्यापार संपुष्ठात आला असून घाण पाण्यामुळे ग्राहक या दुकानांकडे पाठ फिरवित आहेत.
मागील वर्षभरपासून स्टेडियम मधील १५ ते २० दुकानदार सध्या अत्यंत मंद गतीने चालू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे त्रस्त आहेत. वर्षभर धुळ, खड्डे, गंदगी, कचरा यामुळे हे व्यापारी त्रस्त राहिले. रस्त्याचे काम खुपच थंड व निरुत्साहाने सुरु असल्यामुळे ते मुदत संपली तरी संपत नाही. तत्कालीन आयुक्त राहुल रेखावार यांनी सदरील गुत्तेदाराला दंड लावण्याचा प्रयत्न केला.परंतु संबंधीत गुत्तेदार या ना त्या कारणाने आपल्याच पद्धतीने हळूहळू काम करत राहिला. परंतु याचा सर्वाधिक त्रास मात्र स्टेडियम मधील व्यापाNयांना झाला व आजही होत आहे. रस्त्याचे काम आजही पूर्ण झालेच नाही. आता तर एक नवीनच समस्या या रस्ताकामामुळे उभी राहिली आहे. स्टेडियम मधील १५ ते २० दुकानात थोडाही पाऊस पडला की, पाणी घुसत आहे. या पावसाच्या पाण्याला आऊटलेट नसल्यामुळे पाणी या व्यापाNयांच्या दुकानासमोरुन हटता हटत नाही. तब्बल एक महिन्यापासून पाणी व्यापाNयांच्या दुकानासमोर साचून राहिल्यामुळे या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. चक्क पाण्यात जावूनच व्यापाNयांना दुकानात जावे लागत आहे. ग्राहक तर येणेच बंद झाले आहे.
चुकीची नाली बांधली
नवीन सिमेंट रोडच्या बाजुला आता नाली बांधण्यात आली आहे. या नालीमध्ये ना रस्ताचे पाणी जाते ना स्टेडिमधील पाणी जाते. नाली बांधल्यापासून पावसाचे एक लिटरही पाणी या नालीमधून गेले नाही. रस्त्यावरील पाणी रस्त्यावरच राहते. रस्त्यावरील पाणी नालीमधे जाण्यासाठी नालीला छिद्रे असणे आवश्यक होते. परंतु बिना छिद्रांची नाली बांधल्यामुळे नालीचा काहीच उपयोग या व्यापाNयांना होत नाही.
नगरसेवकांनीही केल्या तक्रारी
आज स्टेडियमच्या रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्याची पाहणी भाजपाच्या नगरसेविका मंगला अनिल मुदगलकर, रितेश झांबड, सुनील देशमुख आदींनी केली. यावेळी प्रसिद्ध कर सल्लागार झेड.आर. मुथा, पवन झांजरी, राजेश अंबुरे, दिलीपनाना बोरुळकर, शेख समी, स्वामी आदींसह अनेक व्यापाNयांनी आपल्या तक्रारी मांडल्या. मनपा आयुक्त रमेश पवार यांना थेट भ्रमणध्वनीवरुन नगरसेविका मंगला मुदगलकर यांनी साचलेल्या घाण पाण्याची माहिती दिली. आयुक्तांनी संबंधीत स्वच्छता निरीक्षकांना पाठविण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात मात्र घटनास्थळावर कोणताही अधिकारी आला नाही. आपल्या समस्यांची कुणालाच जाणिव नाही, अशा संतप्त प्रतिक्रीया व्यापारी वर्गातून उमटल्या.
आधी किराया भरा-उपायुक्त विद्या गायकवाड
स्टेडियम मधील व्यापाNयांनी या प्रकरणी अनेकवेळा निवेदने दिली. तक्रार व अर्ज देखील केले. मनपा उपायुक्त विद्या गायकवाड यांच्याशी प्रत्यक्ष भेटून व्यापाNयांनी आपली वैâफीयत मांडली. परंतु उपायुक्त गायकवाड यांनी व्यापाNयांची हि समस्या गांभिर्याने घेतली नाही. सांगते, करते, स्वच्छता निरिक्षकाला पाठविते, आधी किराया भरा अशी गोलगोल उत्तरे देऊन त्यांनी वेळ मारुन नेली. व्यापारी त्यांना भेटून वंâटाळून गेले आहेत.
टिप्पण्या