मुख्य सामग्रीवर वगळा

यंदाही बोंडअळीचा कपाशीवर मोर्चा शेतक-यात चिंतेचे वातावरण ..महासंवाद न्यूज रिपोर्टर सचिन मेश्राम यवतमाळ

तालुका प्रतिनिधी मारेगाव
        मागील वर्षी गुलाबी बोंडअळीने कपाशी उत्पादणात घट आल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे.कसाबसा सावरत मागील वर्षीपासुन सतत संकटाचा सामना करत या वर्षी सुध्दा संकटानी शेतक-यांचा पाठलाग करणे सुरुच असुन कपाशीचे पिक बहरु लागताच शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच तालुक्यातील काही भागात कपाशीवर काळ्या ठीपक्याच्या बोंडअळीने मोर्चा वळविल्याचे  कृषी विभागाच्या क्रॉससँप पाहणीत आढळुन आल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
     मागील वर्षी संपुर्ण तालुकाच गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशीच्या उत्पादणात घट होवून शेतक-यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता.यावर्षी तालुक्यातील जवळपास २७ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली.पेरणी नंतर काही दिवसातच पिक बहरु लागले.बियाने कंपन्यानी सुध्दा १३० ते १५० दिवसात पिक येणारे वाण उपलब्ध करुन दिले.परंतु अवघ्या ४५ ते ५५ दिवसाच्या कालावधित कपाशीच्या झाडांवर काळ्या ठिपक्याच्या बोंडअळीने आक्रमण केल्याचे कृषी विभागाच्या क्रॉससँप पाहणीत आढळुण आल्याने शेतक-यांमध्ये पुन्हा एकदा मागच्या वर्षीची पुनरावृत्ती होते की काय?या आशंकेने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.कृषी अधिकारी व कृषी सहाय्यकांची शेतात जावून पाहणी करणे सुरु आहे.
 
        काळ्या ठिपक्याच्या बोंडअळीने आक्रमण केले असले तरी ती अळी अत्यल्प प्रमाणात असुन त्या अळीपासुन शेतक-यांचे आर्थिक नुकसान होणार नाही.तसेच शेतीमध्ये कामगंध सापळे लावून पिकावर शेतक-यानी काळजीपुर्वक लक्ष ठेवावे.अशी माहिती राकेश दासरवार तालूका कृषी अधिकारी  मारेगाव.यांनी दिली आहे

टिप्पण्या