धामणीच्या शेतक-याचा १५ ऑगष्ट ला आत्मदहणाचा गर्भित इशारा
<>भुसंपादनाची मंजुर रक्कम देण्यास शासनाची दिरंगाई <>
<>मोबदल्यासाठी २५ वर्षापासुन संघर्ष <>
<>न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली<>
<>पिडीत शेतक-याचे वरीष्ठांकडे निवेदन
यवतमाळ :रिपोर्टर सचिन मेश्राम
तालूक्यातील धामणी येथील सुधाकर खिरटकर या शेतक-याची शेतजमिन नरसाळा येथे असुन शासनाकडुन लघुसिंचनासह थेट शेतक-याच्या शेतामधुनच कालव्याची उभारणी करीत शासनाने सदर शेतक-यास भूमिहिन केले.मात्र त्याचा मोबदला देण्यास नायालयाचा आदेश असतांनाही दिरंगाई करीत असल्याचा निषेध करीत हृदय रोगाने पिडीत असलेल्या शेतक-याने भूसंपादनाची मंजुर रक्कम देत नसल्याने येत्या १५ ऑगष्टला स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्याचा गर्भित इशारा दिल्याने शासन प्रशासनाच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुधाकर खिरटकर असे हृदयरोग पिडीत शेतक-याचे नांव असुन त्यांची तालुक्यातील नरसाळा शिवारात ०.५६ हे.आर. शेती आहे.या अल्पशा शेतीवर कुटूंबाचा उदरनिर्वाह कसाबसा चालवित असतांना शासनाकडुन सन १९९२ -९३ मध्ये नरसाळा येथे लघुसिंचनाकरीता प्रकल्प उभारण्यात आला.या कामात पिडीत शेतकरी खिरटकर यांच्या शेतामधुनच मोठा कालवा गेल्याने शेतीचे पुर्णपणे नुकसान होवून "आता जगायाचे कसे "या विवंचनेने अल्पभुधारक शेतक-याने जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.न्यायालयाचा निकाल शेतक-याच्या बाजुने देत जमिनीचा मोबदला शेतक-यास शासनाने तात्काळ प्रदान करावा असे आदेश निर्गमीत केले.मात्र गेल्या पंचविस वर्षापासुन सुरु असलेल्या संघर्षात एकही दमडी पिडीत शेतक-यास प्रदान करण्यात आली नाही.हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या शेतक-यास शासनाकडुन हुलकावनी मिळत असल्याने या निषेधार्थ येत्या स्वातंत्र्यदिनी पिडीत शेतक-याने आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला असुन तशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांचेसह वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहे.शेतक-याच्या गर्भित इशा-याने शासन प्रशासन कोणती पावले उचलतात याकडे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या