यवतमाळ /मारेगाव. देशाचा चौथा आधारस्तंभ प्रसारमाध्यम सद्या वाट चुकत असल्याची भावणा समाजात निर्माण होत असुन लोकशाही मुल्याची जपणुक करणारा प्रसारमाध्याचा बेछुटपणा कधी कधी कुणाच्या अंगलट येतो.हे जपण्यासाठी सामंजसपणाने वृताचे संकलन करुन वृत्तात मार्मिकता असली पाहिजे असा आशावाद महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे मारेगाव तालुका कार्याध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार अण्णाभाऊ कचाटे यांनी व्यक्त केला.कुंभा येथील स्वामी विवेकानंद वाचणालयात आयोजित मारेगाव तालूका मराठी पत्रकार संघटनेच्या सभेत ते अध्यक्षीय स्थानावरुन बोलत होते.नव्याने संघटनेत प्रवेश घेतलेल्या भास्करराव धानफुले यांची प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थिती होती.यावेळी सोशल मिडीयावरील चँनलचे प्रतिनिधी सचिन मेश्राम यांच्या संघटनेतील प्रवेशाचे स्वागत करण्यात आले.
जेष्ठ पत्रकार अण्णाभाऊ पुढे म्हणाले की,ग्रामिण भागात ग्लँमर असणा-या या क्षेत्रात उठसुट कोणीही पत्रकार बनण्याचे जणू पेव फुटले आहे.बुड शेंडा न बघता कसेही वृत्त लिहुन आपले इप्सित साध्य करण्याचा जणु सपाटा लागला आहे.पत्रकारितेचे प्राथमिक ज्ञान नसलेल्या अनेकांना वार्तांकण करताना कोणतेही भान न ठेवता मन मानेल तसे वृत्त लिहीत आहे.वृत्ता मध्ये असलेली आशयगर्भिता,सामाजिक संदेश,वाचकासाठी असलेली जबाबदारी,वृत्तातील मार्मिकता परिणामकारकता या सर्व गोष्टी आड्यावर बांधून मनात येईल तशी बातमी लिहायचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे.प्रशासकीय अधिका-यांपुढे लोटांगण घालण्याचे बातमीदाराकडून होता कामा नये.ही खेदाची बाब झटकूण वृत्तात मार्मिकता आणावी.सभेच्या अनुषंगाने संघटनेच्या विविध प्रश्नावर सांगोपांग चर्चा करुन आगामी काळातील व्युव्हरचना आखण्यात आली.सभेचे प्रस्ताविक कोषाध्यक्ष देवेन्द्र पोल्हे तर सुत्रसंचालन अध्यक्ष दीपक डोहणे यांनी केले.सभेत सचिव मिलींद तोरकडी,मोरेश्वर ठाकरे,कैलास ठेंगणे ,सुनिल उताणे ,सचिन मेश्राम,उत्तम देवगडकर प्रविण वाळके आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.

टिप्पण्या