मुख्य सामग्रीवर वगळा

यवतमाळ जिल्ह्यात वाघाने घेतला १२ वा बळी ...रिपोर्टर :-सचिन मेश्राम यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यात वाघाने घेतला १२ वा बळी
गेल्या वर्षभरातच या वाघाने 11 जणांना आपल्या भक्ष्यस्थानी केले आहे. शनिवार रात्रीपासून राळेगांव तालुक्यातील वेडशी शिवारातील गुलाब मोकाशे हा बेपत्ता होता. आज सकाळी वाघाने खाललेला त्याचा मृतदेह सापडला. हा वाघाचा १२ वा बळी ठरला.
यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगांव; पांढरकवडा तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत जिल्ह्यात वाघाने घेतलेला हा बारावा बळी आहे.
गेल्या वर्षभरातच या वाघाने 11 जणांना आपल्या भक्ष्यस्थानी केले आहे. शनिवार रात्रीपासून राळेगांव तालुक्यातील वेडशी शिवारातील गुलाब मोकाशे हा बेपत्ता होता. आज सकाळी वाघाने खाललेला त्याचा मृतदेह सापडला. हा वाघाचा १२ वा बळी ठरला.
आत्तापर्यंत या वाघाने या भागातील अनेक ढोरांना आपले भक्ष्य केले आहे. वनविभागाने या वाघाला पकडायला शर्थीचे प्रयत्न करुन सुद्धा हा वाघ त्यांच्या हाती लागलेला नाही. अद्यापतरी तिथे वनविभागाचे कोणीही पोहचले नाही. सततच्या या घटनानी या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. आता घटनास्थळी नागरिकांनी मोठा जमाव केला असुन जो पर्यंत वनविभाग या वाघाचा बंदोबस्त करत नाही तो पर्यंत मृतदेह हटवणार नाही ही भूमिका घेतली आहे. यामुळे घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे.

टिप्पण्या