मुख्य सामग्रीवर वगळा

शेतकरी कर्जमाफी व पिककर्ज तात्काळ देण्यात यावे - मनसेची मागणी..रिपोर्टर :- सचिन मेश्राम यवतमाळ

शेतकरी कर्जमाफी व पिककर्ज तात्काळ देण्यात यावे - मनसेची मागणी..
वणी (यवतमाळ): सरकारने मोठा गाजावाजा करत शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. परंतु ही कर्जमाफी सामान्य शेतकऱ्यांना पर्यंत केवळ कागदोपत्रीच पोहचली, यात उपविभागातील जवळपास २५ ते ३० हजार शेतकरी वंचित राहिले.याच वंचित शेतकऱ्यांनी काल मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांची भेट घेऊन सदर विषयात मदत करण्याची मागणी केली. यावर तात्काळ प्रतिसाद देत उंबरकर यांनी वंचित शेतकऱ्यांसह उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन यासंबंधित अधिकाऱ्यां व बँकांना कर्जमाफीतील वंचित शेतकऱ्यांची माहिती घेऊन यावरील कर्जमाफी तात्काळ देऊन पुन्हा कर्ज देण्याचे आदेश देण्यात यावे या आशेयाचे निवेदन दिले. येत्या २ ते ३ दिवसात कुठलेही कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल अशी प्रतिक्रिया यावेळी मनसे राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांनी दिली. याप्रसंगी विभागतील अनेक वंचित शेतकऱ्यांसह असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते..

टिप्पण्या