भाजपच्या नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्या मोटारीवर मराठा आंदोलनावेळी झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात २५ जणांविरोधात अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासहित आयपीसीच्या कलम ३०७, १४३, १४७, ३४१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खासदार हिना गावित यांच्या गाडीवर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ काल हल्ला झाला होता. या हल्ल्यातून गावित थोडक्यात बचावल्या होत्या. या हल्लेखोरांवर कारवाई करण्यात यावी तसेच सबंधित पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी त्यांनी लोकसभेत केली होती.दरम्यान काल गावित यांना झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज भाजपाकडून नंदुरबार शहर, व नवापूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला . दुपारी अडीच्या सुमारास धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान गावित यांना कार्यालयातचं रोखण्याचा प्रयत्न झाला. काही आंदोलकांनी गावित यांच्या गाडीवर चढून हल्ला केला होता.
टिप्पण्या