मुख्य सामग्रीवर वगळा

राजुभाऊ उंबरकर यांच्या पुढाकारातुन साकारला सिंधी पांदण रस्ता..सचिन मेश्राम प्रतिनिधी यवतमाळ


यवतमाळ जिल्ह्य़ात मारेगांव तालुक्यातील सिंधी येथील शेतकऱ्यांचा शेतीकडे जाणारा पांदण रस्ता अतिशय बिकट परिस्थिती असताना, यातून शेतकरी व जनावरांना वहिवाट करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. गेल्या कित्येक वर्षांपासून ह्या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे,मात्र याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, अखेर येथील शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी मनसे राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांची भेट घेऊन यासंदर्भात मदत करण्याची विनंती केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर हे काम करून देण्याचा शब्द राजुभाऊनी शेतकऱ्यास दिला, अखेर हा शब्द आज पूर्णत्वास देत.राजुभाऊं उंबरकर व गावकऱ्यांच्या  उपस्थितीत ह्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. लवकरच हा पांदण रस्ता गावकऱ्यांच्या सेवेत उपलब्ध होईल.
         यावेळी गावातील संतोष निब्रड, दशरथ डाहुले, ज्ञानेश्वर पोतराजे, मनोहर थेरे,नामदेव बोंडे, नामदेव जांभुळकर, राजु गायकवाड, प्रदीप डाहुले यांच्या सह सर्व गावकरी आपली कामे सोडून या सोहळ्यास उपस्थित होते तसेच मनसेचे अविनाश लांबट(विभागाध्यक्ष कुंभा), वैभव वैद्य, राहुल पोतराजे, सुधीर डाहुले,प्रशांत ढवस,गणेश खुसपुरे, उमेश डाहुले,सोपान नागोसे, धनराज ढवस,महेश गाडगे,धनंजय त्रिंबके(माजी आरोग्य सभापती),आजिद शेख, लक्की सोमकुंवर, श्रीकांत सांबजवार,अमोल मसेवार, धम्मादीप शंभरकर, हिमांशू बोहरा, शुभम पिंपळकर, नितीन ताजने, इरफान सिद्धकी आदी उपस्थित होते..

टिप्पण्या