मुख्य सामग्रीवर वगळा

गंगाखेडात शांततेत बंद यशस्वी : सकल मराठा समाजाच्या वतीने दिले तहसिलदारांना निवेदन

गंगाखेडात शांततेत बंद यशस्वी :
सकल मराठा समाजाच्या वतीने दिले तहसिलदारांना  निवेदन


गंगाखेड- येथे आज गुरुवार रोजी (दि. 9) क्रांती दिनानिमित्त महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी होऊन मराठा समाजाच्या वतीने गंगाखेड शहर बंद ठेवण्यात आले. परळी नाका येथे भजन करून टाळ मृदंगाच्या निनादाने महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधले. परळी नाका येथे सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हे आंदोलन सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू ठेवण्यात येऊन तहसीलदार यांना एक निवेदन देण्यात आले.
गंगाखेड येथील तहसीलदार यांना देण्यात आलेल्या  निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे  16% आरक्षण द्यावे, दि.  23 जुलै 2018 रोजी मराठा समाजातील तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, कोपर्डीतील गुन्हेगाराला लवकर फाशी द्यावी, शहीद झालेल्यांच्या वारसांना सरकारी नोकरीत समाविष्ट करावे आदीचा यात समावेश होता.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालासाहेब निरस, किशनराव भोसले, साहेबराव भोसले मुळीकर, डॉ. सुभाष कदम, उद्धव सातपुते, गंगाधर पवार, भास्कर काळे, ज्ञानेश्वर जाधव, रमजान भाई कुरेशी, वसंतराव चोरघडे, भानुदास सोळंके, गिरीश सोळंके, दिगंबर निरस, तुळशीदास निरस तसेच संत जनाबाई मंदिर भजनी मंडळाच्या प्रयागबाई मोरे आदींची यावेळी उपस्थिती होती.
गंगाखेड शहरात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. बसस्थानकातून एकही एसटी धावली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. या बंदच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला  होता.

टिप्पण्या