सदैव कार्यकर्त्यांच्या पाठीशी :-आ.घनदाट राणीसावरगाव (प्रतिनिधी)येथे मा.आ.सीताराम घनदाट युवा मित्र मंडळाच्या नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुती आप्पा कोरे प्रमुख पाहुणे म्हणून सदाशिव आप्पा ढोले ,माधव ठावरे ,दत्तराव भोसले सतीश चौधरी ,जयसिंग आप्पा शिंदे, आत्माराम सोडणार ,गोपीनाथ तुडमे,आप्पासाहेब देशमुख, आदीजण उपस्थित होते या प्रसंगी आ.सीताराम घनदाट मामा म्हणाले की राणी सावरगाव परिसरातील आजी-माजी कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांच्या सदैव पाठीशी राहून कोणतेही काम असेल तर हाक द्या मी ओ देत कामे करेन तसेच मी आमदार असताना दुष्काळात पाण्याची व्यवस्था, गोरगरीब जनतेसाठी घरकुल, सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या उपलब्ध करून देत अनेक गरिबांची घरे सुधारण्याची कामे मी माझ्या काळात केली आहेत आणि सदैव करीत राहील असे यावेळी ते म्हणाले नवनिर्वाचीत शहराध्यक्ष सय्यद मुसद्दिक ,उपाध्यक्ष तुकाराम जिल्हेवाड ,विष्णू टोकलवाड, रमेश राठोड ,सचिव समाधान जाधव ,स...