मुख्य सामग्रीवर वगळा

गंगाखेड तहसीलसमोर कॉंग्रेसने घातला जागर-गोंधळ

*गंगाखेड तहसीलसमोर कॉंग्रेसने घातला जागर-गोंधळ
!*
🔹 भारनियमन बंद करण्यासाठी प्रशासनाला साकडे 🔹
गंगाखेड :
ऐन नवरात्रीत महावितरण कंपनीने सुरू केलेल्या भारनियमनाविरोधात सर्वसामान्यांमध्ये आक्रोश दिसून येत आहे. या भारनियमनाच्या विरोधामध्ये गंगाखेड काँग्रेस कमिटीच्या वतीने आज अनोखे आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयासमोर देवीचा जागर आणि गोंधळ घालून भारनियमन रद्द  करण्याचे साकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रशासनाला घातले. तहसील कार्यालयाच्या दारात तासभर सुरू असलेल्या देवीच्या आराध्यांच्या गोंधळाने ऊपस्थितांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले होते. विज वितरणच्या अधिकाऱ्यांनी भारनियमन रद्द करण्या बाबतचा प्रस्ताव वरीष्ठांकडे आजच पाठविण्याचे अश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली असून ,या उत्सवाच्या सुरुवातीपासूनच महावितरणने राज्यभरात भारनियमनाचा श्रीगणेशा केला आहे.मागील तीन ते चार दिवसांपासून ,जिल्ह्यात सर्व शहर तसेच ग्रामीण भागामध्ये भारनियमन सुरू करण्यात आले . काही ठिकाणी तर संध्याकाळच्या वेळी बत्ती गुल होते .त्यामुळे सणासुदीच्या काळामध्ये महिला आणि भाविकांना दर्शनासाठी बाहेर पडताना अडचणी येत आहेत.  त्यामुळे भारनियमन रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे .यासाठी गंगाखेड शहरात काँग्रेस पक्षातर्फे हे आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान तहसील कार्यालयाच्या समोर देवीचा जागर आणि गोंधळ घालण्यात आला .महावितरण भारनियमन सुरू केल्यामुळे सर्वसामान्यांना त्रास आणि मनःस्तापाला सामोरे जावे लागत आहे. यामुळेच देवीसाठीचा हा जागर प्रशासनासाठी करण्यात आला. यातून महावितरणच्या अधिकाऱ्यांना भारनियमन बंद करण्याची बुद्धी दे, असा जोगवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी देवीकडे मागितला. हिंदुंचे तारणहार म्हणवून घेणारे हे सरकार समस्त भाविक भक्तच नव्हे, तर देवी-देवतांनाही त्रास देत अससल्याची टिका यावेळी बोलतांना तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी केली.

आंदोलन सुरू असतानाच तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी विज वितरणच्या अधिकाऱ्यांना तहसील कार्यालयात पाचारण केले. ऊपकार्यकारी अभियंता संजय जाधव, सहाय्यक अभियंता नितेश भसारकर यांनी हा विषय राज्य पातळीवरील असल्याचे सांगत कॉंग्रेसच्या मागणीचा प्रस्ताव आजच वरीष्ठांकडे पाठवत असल्याचे सांगीतले. या अश्वासनानंतर जागर- गोंधळ आंदोलन थांबविण्यात आले. कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शहराध्यक्ष शेख युनूस, सुशांत चौधरी, नगरसेवक प्रमोद मस्के, गोपीनाथ लव्हाळे, रोहिदास घोबाळे, सय्यद चांद, दत्तराव भिसे, कुलदिप जाधव, माधव शिंदे, संतोष समशेटे, संजय सोनटक्के, शेख सादेकभाई, संजय धारे, चेअरमन किसनराव सुर्यवंशी, नेते सुर्यवंशी, गंगाधर महाराज गौंडगावकर, वामनराव काळे, राजाभाऊ शेळके, व्यंकट यादव, शेख साबेर, मिलींद पारवे, नागेश डमरे, योगेश फड, कृष्णा घरजाळे, महेश वाळके, मानव मुक्ती मिशनचे सदाशिव भोसले, भगवती युवक मंडळाचे नंदू सोमाणी, गोविंदराव भोसले, साबेर शेख, मारोतराव सुर्यवंशी, संतोष वाघमारे, गजानन सुर्यवंशी, जगन्नाथ मुंडे, बाबर, शितोळे, सुलेमान, जावेद शेख, खलील मामू आदिंसह कॉंग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते ऊपस्थित होते. आरखेड येथील आराधी बामणे यांनी संबळ वाजवत गोंधळ घातला. कॉंग्रेसच्या या आगळ्या आंदोलनाची संपुर्ण शहरात जोरदार चर्चा होत आहे.

टिप्पण्या