संशोधन हे समाज उपयोगी व्हावे-- बिसेन
नांदेड
कुठले ही संशोधन हे समाज उपयोगी नसेल तर त्याचा काहीच फायदा नाही असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ जोगेंद्रसिंग बिसेन यांनी केले .
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यम शास्त्र संकुल व आय सी एस एस आर यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या 10 दिवसीय कार्य शाळेचे उद्घाटन करताना केले.
या वेळी व्यासपीठावर आय सी एस एस आर चे संचालक डॉ अजय गुप्ता ,अधिष्ठाता डॉ वसंत भोसले , डॉ कृष्णामाचार्यलु , डॉ दुर्गेश त्रिपाठी, माध्यम शास्त्र संकुलाचे संचालक डॉ दीपक शिंदे यांची उपस्थिती होती.
या वेळी बोलताना आय सी एस एस आर चे संचालक डॉ अजय गुप्ता यांनी देशात सामाजिक शास्त्र शाखेत दर्जेदार शिक्षण व्हाव या साठी संस्था प्रयत्न करत असल्याचे सांगितले, त्याचाच एक भाग म्हणून ही कार्यशाळा आयोजित केल्याचे ते म्हणाले. आय सी एस एस आर चे कार्य या वेळी त्यांनी विस्ताराने सांगितले.
या वेळी बोलताना अधिष्ठाता डॉ वसंत भोसले यांनी दर्जेदार संशोधनाची गरज कशी आहे याची माहिती सांगितली. विद्यापीठ संशोधनाला प्रोत्साहन देत परंतु संशोधकांनी दर्जा राखुन काम केल्यास विद्यापीठ व त्यांचे नाव लौकिक होईल असे सांगितले. या वेळी बोलताना सेन्सॉर बोर्डाचे माजी सदस्य डॉ दुर्गेश त्रिपाठी यांनी जगतील व देशातील संशोधनाची माहिती सांगितली.
10 दिवसीय कार्यशाळे ची माहिती आयोजक डॉ दीपक शिंदे यांनी दिली. या कार्यशाळेकरिता देशभरातून 300 पेक्षा जास्त अर्ज आले होते आय सी एस एस आर च्या नियमानुसार प्रवेश देण्यात आले, अनेकांना निराश व्हावे लागले असे ते म्हणाले. विद्यापीठात आशा प्रकारे होणारी ही पहिलीच कार्यशाळा असून त्यास मान्यता दिल्याबद्दल आय सी एस एस आर चे डॉ शिंदे यांनी आभार मानले.
या वेळी अधिष्ठाता कृष्णमाचार्यलु यांचे ही भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना डॉ सचिन नरंगले यांनी या कार्यशाळेत संशोधक विद्यार्थी व मार्गदर्शक मिळून 14 राज्यांनी सहभाग घेतला आहे असे सांगितले.
या वेळी डॉ रणजित धर्मापुरीकर, डॉ राजेंद्र गोणारकर , यांच्या सह संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेक राज्यांचा सहभाग
या कार्यशाळेत राजस्थान, दिल्ली,छत्तीसगड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू या राज्यातील संशोधक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

टिप्पण्या