मुख्य सामग्रीवर वगळा

राजश्री जामगे यांच्या जनसंवाद यात्रेचा दूसरा टप्पा संपन्न

सुखापुरी (प्रतिनिधी)

अंबड तालुक्यातील सुखापुरी व महसूल मंडळातील लखमापुरी,बेलगांव,रेवलगाव,वडिकाळ्या,कुकडगाव,रुई,भारडी सह इतर गावात जाऊन परभणी येथील समनविका राजश्री जामगे यांनी जनसंवाद यात्रा,लाभार्थी संपर्क,"बेटी बचाव बेटी पढाओ" तसेच प्रत्येक शाळेत सुंदर हस्ताक्षर स्पर्धा या अभियाना अंतर्गत घनसावंगी मतदार संघात यापूर्वी पहिल्या टप्प्यात ५८ व आता दुसर्‍या टप्यात ६६ अश्या १२४ गावांना दोन टप्यात भेटी देऊन गावांची परिस्थिती समजून घेतली.
बेटी बचाओ बेटी पढाओ परभणी जिल्हा समन्वयीका व परभणी लोकसभा मतदार संघाच्या भाजपच्या लाभार्थी संपर्कप्रमुख राजश्री जामगे गेल्या पाच दिवसांपासुन घनसावंगी मतदार संघात फिरुन संवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी तसेच विद्यार्थ्यांशी गावोगाव जाऊन संपर्क साधत आहेत.पाच दिवशीय दौर्‍याच्या दुसर्‍या टप्याच्या शेवटच्या दिवशी सुखापुरी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहीती दिली.पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, 'दुष्काळाशी सामना करत असतांना महाराष्ट्र शासन जनावरांसाठी चारा छावण्या,टंचाईग्रस्त क्षेत्रात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर,स्वस्त धान्य दुकानातुन धान्य वाटप तसेच मजुरांच्या हातांना काम,या चार गोष्टी सरकार करेलच,पण आपणही नागरीक या नात्याने दुष्काळाशी सामना करत असताना एकमेकांना मानसिक आधार द्यावा'.पत्रकाराने लोकसभेसाठी आपण ईच्छुक आहात का असा प्रश्न विचारला असता,युती होण्याची शक्यता आहे आमचे नेते मंडळी त्यासाठी प्रयत्नशिल आहेत. देशहितार्थ गरज पडल्यास कार्यकर्ते,जनता जनार्धनाच्या आग्रहा खातर २०१९ च्या लोकसभा निवडणुक रिंगणातही उतरेन,पण सध्या तो विषय पक्षश्रेष्ठींवर अवलंबून आहे.गेल्या चार वर्षात परभणी लोकसभा मतदारसंघात केंद्र व राज्य सरकार च्या योजनांचा लाभ ज्या भागात मिळाला व जे या योजनेतुन वंचित राहीले आहेत अश्या ९६७ गावांना मी भेटी दिल्या असुन येत्या बारा आठवड्यात मतदारसंघातील सर्व गावांना भेटी देण्याचा नियोजनबद्द कार्यक्रम आखण्यात आला आहे,यासाठी सर्वांची साथ अपेक्षित आहे असे जामगे यांनी माहिती दिली.

टिप्पण्या