#रायपूर_एक_गाव..
जैसे जैसे सहकार्य वाढे।
तैसे गाव उन्नतीस चढे।
सेलू या तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर असणारं,खडतर रस्त्याचं आणि आडवळणावर असणारं गाव म्हणजे रायपूर. या गावाचा रस्ता खडतर असला तरी,हे गाव सर्वांना आपले आणि प्रिय वाटते कारण, या गावातील माणसे खूप मृदू स्वभावाची आणि चांगल्या वळणाची आहेत.यामुळेच या गावाचा प्रत्येकाला लळा लागतो आणि तो गावाशी एकरूप होऊन जातो.
या गावात सर्व धर्माची,जातीची लोक गुण्यागोविंदाने राहून,शांततामय वातावरण स्वीकारतात.एकमेकांच्या मताचा आदर करत आणि सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करत राहतात.
या गावाची सर्वांसाठी अनुकरणीय एक बाब आहे आणि ती म्हणजे गावाची एकता.रायपूर मध्ये जरी करता महाराष्ट्रात असणाऱ्या सर्वच राजकीय पक्ष्यांचे नेते किंवा कार्यकर्ते असले तरी,गावात एखादेवेळी घडणाऱ्या किंवा घडलेल्या सुख दुःखाच्या प्रसंगी सर्वच लोक तत्परतेने एकत्र येतात.आणि आलेल्या समस्येवर,प्रसंगावर प्रसंगावधान राखून तोडगा काढून पीडित व्यक्तीस,कुटुंबास सामाजिक, मानसिक व आर्थिक आधार देऊन खंबीरपणे साथ देतात,ग्रामगीतेत तुकडोजी महाराजानी म्हटल्याप्रमाणे....-
परस्परांना मदत करावी।
अडीअडचण ती निभवावी।
सर्वांकडोनी करोनि घ्यावी।
योग्य सेवा ।।
अशा कठीण प्रसंगी सर्वजण एकत्रित येऊन तन-मन-धनाने मदत करतात.आताच काही दिवसांपूर्वी एका कुटुंबावर काळाने खूप मोठा घाला घातला, त्यावेळी या गावाने फक्त तालुका,जिल्हाच नव्हे तर पूर्ण राज्यासाठी एक आदर्श घालून दिला.यावेळी गावातील सर्वच जाती-धर्मातील लहान-थोर,गरीब-श्रीमंत स्त्री-पुरुषांनी केवळ माणुसकीचा धागा पकडून संबंधित पीडिताच्या उपचारासाठी लाखो रुपयांची मदत करून मनोभावे सहकार्य केले-
जैसे जैसे सहकार्य वाढे।
तैसे गाव उन्नतीस चढे।
न पडे विपत्तीचे कोडे।
गावी कोणा मानवासि।।
या ग्रामगीतेतील ओवी प्रमाणे गावातील सर्वजन सर्वांच्या मदतीसाठी किंबहुना विकासासाठी प्रयत्न करताना आढळून येतात.
आताच काही दिवसांपूर्वी गावातील विविध कार्यक्रम साजरे करण्यासाठीची अडचण लक्षात घेऊन,सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन लोकवर्गणी जमा केली.आणि जमा केलेल्या वर्गणीतून शहरातील मंगलकार्यालाला तोडीस तोड देणारे भव्य दिव्य असे 60*120 फूट क्षेत्रफळ असणारे,सर्व सोयीयुक्त असे मंगल कार्यालय उभारले आहे.यामुळे गावातील अनेक कार्यक्रम सुरक्षित पणे पार पाडणे शक्य झाले आहे.यामुळे गावकऱ्यांचे मनभरून कौतुक वाटते.
गावात वारकरी संप्रदायाची परंपरा अखंडपणे चालू असल्याने,अध्यात्मिक पाया मजबूत आहे.आणि या अध्यात्माच्या माध्यमातून परमार्थ साधत शाळेसाठी भरघोस मदत करून विकासासाठी धडपडणारं कोणतं गाव दिसत असेल तर ते गाव म्हणजे माझं रायपूर आहे.असं म्हणताना मला आनंद वाटतो.शाळेस जेंव्हा जेंव्हा आर्थिक किंवा अन्य स्वरूपाची मदत लागेल तेव्हा कोणत्याही स्वरूपाची मदत करण्यास नागरिक हात आखडता घेत नाहीत.यांच्याच सहकार्यातून आजवर शाळेसाठी रंगरंगोटी, e-लर्निंग चे सर्व साहित्य,शाळेच्या संरक्षणासाठी तारेचे कुंपण,दरवर्षी मुलांना क्रीडामहोत्सवा नंतर प्रोत्साहन पर बक्षिसाठी चार हजार रुपयांची मदत केली जाते.आमच्या गावाची ग्रामपंचायत सुद्धा चौदाव्या वित्त आयोगातून दरवर्षी आवश्यक असणाऱ्या साहित्यांचा पुरवठा करत असते.मागील वर्षी ग्रामपंचायतच्या वतीने कपाट मोठे-१, छोटे कपाट-१ बुकेस(ग्रंथालयाचे कपाट)-१, ऑफिस टेबल-१, संगणक संच-२, संगणकासाठी टेबल-२, प्रिंटर कम स्कॅनर-१, खुर्च्या-६, फिरती खुर्ची-१, सिलिंग फॅन-५, वॉटर फिल्टर(२५लिटर)-१,पोषण आहार तयार करण्यासाठी गॅस सिलेंडर सेट आणि यंदाही संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू केले आहे.यासाठी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच,सर्व सन्माननीय सदस्य आणि सचिवांचे मनःपूर्वक धन्यवाद.
पाठशाळा असावी सुंदर।
जेथे मुले मुली होती साक्षर।
कार्य करावयासि तत्पर।
शिकती तेथे प्रत्यक्ष।।
ग्रामगितेतील या ओवीची जाणीव ठेवून शाळेत होणाऱ्या विविध कार्यक्रमाचे सादरीकरण अजून चांगले होण्यासाठी उच्च दर्जाच्या ध्वनिक्षेपक यंत्रणेची(साऊंड सिस्टिमची)आणि भाषण मंच(डायस/पोडीएम) अत्यंत महत्वाची गरज ओळखून यावर्षी सुद्धा तब्बल 28422 रुपयांची लोकवर्गणी जमा करून शाळेला वरील आवश्यक साहित्यांची अनमोल भेट दिली आहे.यातून गावकऱ्यांना शाळेविषयी किती जिव्हाळा आहे हेच प्रतिबिंबित होते.ज्ञानाच्या पवित्र यज्ञाकुंडात आपल्या सारख्या साधकांनी दानरुपी धनाची जी समिधा टाकली आहे,यातून या ज्ञानयज्ञाचा तेजोमय प्रकाश सर्वत्र तेज पसरवल्याशिवाय विझणार नाही याची आम्ही आपणास ग्वाही देतो.
गावातील प्रत्येकाची शाळेच्या विकासासाठी धडपड चालू असते.प्रत्येकजण आपापल्या परीने शाळेसाठी चांगले करण्यासाठी प्रयत्नशील असतो,हे पाहून खूप आनंद वाटतो.या गावातील मनाला आवडणारी अजुन एक गोष्ट म्हणजे, शाळा व्यवस्थापन समितीचे आजपर्यंतचे सर्वच अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य हे शाळेची स्वतःच्या लेकरासारखी काळजी घेऊन पालकत्व स्विकारतात हे पाहून मला संत तुकाराम महाराजांची ओवी आठवते,ते म्हणतात की-
लेकुराचे हित।
वाहे माऊलीचे चित्त।।
ऐसी कळवळ्याची जाती।
करी लाभविन प्रीती।।
शेवटी हे सर्व पाहून मला असे वाटते,की विचारांना विकासाची योग्य दृष्टी असली की,नविन सृष्टी निर्माण होऊन तेथे आनंदाची वृष्टी होण्यास विलंब लागत नाही.हे आम्ही सर्वजण रायपूरकरांच्या दातृत्वाने चिंब भिजत अनुभवत आहोत.
भविष्यात देखील आपल्या प्रेमाचा ओलावा असाच कायम राहून,काही दिवसातच आपली शाळा हिरवीगार झाल्याशिवाय राहणार नाही असे वाटते.आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि सहकार्य असेच कायम राहो.अशी आपणास शाळेच्या वतीने विनंती करतो.
आभारकर्ते-शाळा व्यवस्थापन समिती,मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रायपूर ता.सेलू जि परभणी.
#शब्दांकन
-माधव लिंबाजीराव गव्हाणे
जि.प.प्रा.शाळा,रायपूर ता.सेलू
9404833100

टिप्पण्या