औरंगाबाद:
यावेळी सुनील धात्रक, सोपान जाधव, बाबासाहेब बोडखे, चरणसिंग जुनी, उषा चितळे, बाबासाहेब चितळे, बाळासाहेब तळेकर, बळीराम तांबारे, शांताबाई कुंडलवाल, मिर्झा एकबाल बेग, मिर्झा इस्माईल बेग, शेख महेमुद शेख लाल, जावेद शेख, बब्बु शेख आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी) औरंगाबाद- धुळे महामार्गासाठी भुसंपादन झालेल्या प्लॉट धारकांना मोबदला मिळाला नाही म्हणुन गट नं.२२५/६ , कोहीनूर पार्क, मौजे तिसगांव येथील बाधीत लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. महामार्ग क्र.२११ साठी भूसंपादन झालेल्या प्लॉट धारकांनी वेळोवेळी भुसंपादन अधिकारी, उपअधिक्षक भुमी अभिलेख यांच्या कडे रजिस्ट्री ची छायांकित प्रत आवक जावक विभागात दिली आहे. संजय शिवनारायण शर्मा यांचेकडून प्लॉट खरीदी करून अनेक वर्ष वर्षे झालेली आहे. गरीब मोलमजूरी करणा-यांनी पोटाला चिमटा देवून घर बणवण्यासाठी हे प्लॉट खरेदी केले असताना ही जागा महामार्गासाठी भूसंपादीत झाली आहे. मोबदल मिळावा यासाठी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने शासनाला मोबदला देण्याचे आदेश दिल्यानंतरही संबंधितांना मोबदला मिळाला नाही म्हणून प्लॉट धारकांवर आमरण उपोषण सुरू केले आहे.यावेळी सुनील धात्रक, सोपान जाधव, बाबासाहेब बोडखे, चरणसिंग जुनी, उषा चितळे, बाबासाहेब चितळे, बाळासाहेब तळेकर, बळीराम तांबारे, शांताबाई कुंडलवाल, मिर्झा एकबाल बेग, मिर्झा इस्माईल बेग, शेख महेमुद शेख लाल, जावेद शेख, बब्बु शेख आदी उपस्थित होते.
टिप्पण्या