नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने मोठा बदल केला आहे. प्रियांका गांधी यांनी राजकारणात अधिकृत प्रवेश केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज प्रियांका गांधींना काँग्रेस सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली. तसंच प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पूर्वची जबाबदारी देण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेश पश्चिमचं नेतृत्त्व ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
प्रियांका गांधी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कार्यभार स्वीकारणार आहेत. या निर्णयामुळे इतके दिवस पडद्यामागे काम करणाऱ्या प्रियांका गांधी यांना पहिल्यांदाच संघटनेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. तसंच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींची यावेळी निवडणूक लढण्याची शक्यता कमी असल्याने प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का अशीही चर्चा रंगू लागली आहे

टिप्पण्या