मुख्य सामग्रीवर वगळा

निमंत्रण पत्रिकेत मेटेंचं नाव नसल्यानं डॉक्टरला मारहाण

बीड : बीडमध्ये शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याने डॉक्टरला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवसंग्रामचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटेचं नाव कार्यक्रम पत्रिकेत टाकलं नसल्यानं कार्यकर्त्याने दादागिरी करत डॉक्टरला मारहाण केली.राहुल आघाव असं मारहाण करणाऱ्या शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. डॉक्टर सोमनाथ पाखरे यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि आमदार जयदत्त क्षीरसागर येणार होते. मात्र या उद्घाटनासाठीच्या पत्रिकेत डॉ. पाखरेंनी विनायक मेटेंचं नाव टाकलं नव्हतं.यामुळे संतापलेल्या राहुल आघावने विनायक मेटेंचं नाव पत्रिकेत का नाही टाकलं याचा जाब पाखरेंना विचारत त्यांना बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे राहुल आघावने डॉ. पाखरेंना केलेली मारहाण सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ज्यामध्ये तब्बल दहा मिनिटे राहुल आघावने सोमनाथ पाखरे यांना मारहाण केल्याचं दिसून येत आहे. राहुल आघाव दारुच्या नशेत असल्याची माहिती डॉ. पाखरेंनी दिली.

टिप्पण्या