शिवसंकल्प प्रतिष्ठाण तर्फे यात्रेकरुसाठी मोफत मिनरल वाटप
कै.लक्ष्मणराव एजगे यांच्या स्मरणात सामाजिक कार्यकर्ते मारोती एजगे यांचा स्तुत्य उपक्रम
पेनूर....
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पेनूर येथील हिंदु-मुस्लीम एकतेचे प्रतिक असलेले श्री सय्यद बाबा यात्रेनिमित्त शिवसंकल्प प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मारोती एजगे यांचे वडील कै.लक्ष्मणराव एजगे यांच्या स्मरणात मोफत मिनरल वाटरचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ नागरीक माधवअप्पा कंधारकर यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ.अशोकराव पा.गवते.यावेळी शिवसेना नेते मुक्तेश्वरराव धोंडगे,तिरूपती घोरबांड,पांगरीचे माजी.सरपंच राम पा.पांगरीकर, सोनखेड पोलीस स्टेशनचे बिट जमादार गुरु कारामुंगे साहेब,जाधव साहेब,साखरे साहेब,फुलवळ ग्राम पंचायतचे सरपंच धोंडिबा मंगनाळे,छत्रपती शिवाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शिवाजी हंबर्डे,छोटा बालक चि.विघ्णेश एजगे,सामाजिक कार्यकर्ते मारोती कांबळे,पत्रकार विरभद्र एजगे,बालाजी ढेपे,बाळाजी आव्हाड यांची उपस्थिती होती. पेनूर परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले शिवसंकल्प प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मारोती एजगे यांनी यात्रेकरुसाठी हा स्तुत्य उपक्रम राबविल्या बद्धल मारोती एजगे यांचे अनेकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करुन शुभैच्या दिल्या.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसंकल्प प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मारोती एजगे,राजु आराळे,विष्णुकांत आराळे,उत्तम लुटे,प्रतिष्ठाणचे सचिव तथा पत्रकार विरभद्र एजगे,देवराव वाघमारे यांनी परिश्रम घेतले.या थंडगार पाण्याचा हजारो यात्रेकरूनी लाभ घेऊन सतत सामाजिक कार्यात सहभागी राहाणाऱ्या युवा नेत्याचे कौतुक केले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या