राणीसावरगांव (प्रतिनिधी) गंगाखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या राणीसावरगांव येथील सरपंच सोमनाथ कुदमुळे यांच्यावर अविश्वस दाखल करण्यात आला होता सरपंच सोमनाथ कुदमुळे, यांनी अविश्ववासा विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले होते. यावर जिल्हाधिकारी परभणी यांनी गंगाखेड तहसीलदार यांचे म्हणने ऐकुन घेत सोमनाथ कुदमुळे यांच्या विरोधात निकाल दिला .निवडीची तारीख देऊन तात्काळ रिक्त पदावर निवड करा अश्या सुचना दिल्या होत्या यावरून दि.3 जानेवारी रोजी शहिद भगतसिंग सभागृहात नवनिर्वाचित सरपंचाची निवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे यात सुरेश चव्हाण यांची वर्णी लागणार आहे या निवडीसाठी राणीसावगाव विकास आघाडीच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत यामध्ये पँनल प्रमुख मधुकरराव जाधव , सय्यद अल्ताफ , नारायण जाधव , ज्ञानेश्वर जाधव , प्रदीप जाधव , रमेश कुलकर्णी , बाबूभाई गुत्तेदर , ओंकार आंधळे , आदींच्या नेत्रत्वाखाली सरपंच सुरेश चव्हाण यांची निवड करण्यात येणार आहे
टिप्पण्या