मुख्याध्यापकासह 7 शिक्षकांनी शाळेला मारली दांडी
मुख्याध्यापकावर कार्यवाही करा :-शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्षाची मागणी
राणीसावरगाव (प्रतिनिधी) तेथुन जवळच असलेल्या मौजे घंटाग्रा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ही दि.5 जानेवारी रोजी सकाळ पासून बंद ठेऊन मुख्याध्यापकासह शाळेचे कर्मचारी शाळेकडे फिरकलेच नसून त्यानी शाळेला दांडी मारल्याचा प्रकार उघडकीस आणल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिवसभर बंद ठेवून मुख्याध्यापक गैरहजर असल्याचे दिसून आल्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी शाळेला दिवसभरासाठी कुलूप असल्याचे गटशिक्षणधिकारी गंगाखेड तसेच केंद्र प्रमुख यांना माहीती कळवली असता सदरील घटनेचा पंचनामा करून तो तात्काळ माझ्याकडे पाठवा चोकशी अंती दोषींवर कार्यवाही करण्यात येईल असे सांगण्यात आले होते यावरून दुपारी 2 वाजता उपस्थित असलेल्या पालक व ग्रामस्थांनी पंचनामा केला पंचनाम्यावर पांडुरंग बडवणे, मंगेश इमडे, अनंत पवार, मारोती गोरे, रामजी पवार,विठ्ठल पवार, सुधाकर पवार आदीच्या सह्या आहेत यावेळी उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग बडवणे यांनी संबंधित मुख्याध्यापक हंबीर यांच्यावर विविध आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे
मुख्याध्यापकाने आज दिवसभरासाठी शाळा बंद ठेवली त्यामुळे शाळेचे 182 मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहिले तर दिवसभर मुख्य गेटला कुलूप लावण्यात आले होते हे पाहून विद्यार्थी शाळा उघडेल या आशेने बराच वेळ पिठीवर दप्तर घेऊन रोडच्या कडेला आपल्या गुरुजनांची वाट पाहत बसले होते हा प्रकार म्हणजे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा असून दोषीं कर्मचारी यांच्यावर जिल्हा शिक्षणधिकारी काय कार्यवाही करतील याकडे लक्ष लागले आहे
वरिष्ठांना अहवाल पाठविणार :-गटशिक्षणाधिकारी बालाजी सगट
जिल्हा परिषद शाळेला मर्जीनुसार सुट्टी देणाऱ्या मु.अ हंबीर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल यासाठी वरिष्ठांना योग्य तो अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी बालाजी सगट यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले

टिप्पण्या