Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

साताऱ्यात मुलीची गळा चिरून हत्या

सातारा, (प्रतिनिधी
): महाविद्यालयीन युवतीचा गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. साताऱ्यातील करपेवाडी गावातील ही धक्कादायक घटना घडली आहे. भाग्यश्री माने असं खून झालेल्या मुलीचं नाव आहे.भाग्यश्री माने या 12 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची मंगळवारी हत्या करण्यात आली. आरोपीनी नराधमाने भाग्यश्रीचा गळा चिरून शीर धडावेगळं केलं आणि तिचा मृतदेह उसाची शेत असणाऱ्या बाधांवर फेकून दिला. या क्रूर हत्याकांडाने साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.भाग्यश्रीची हत्या कोणत्या कारणासाठी करण्यात आली याबाबत अजून माहिती मिळाली नाही. हत्येची घटना समोर आल्यानंतर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत आरोपींचा शोध लागू शकलेला नाही. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.दरम्यान, महाविद्यालयीन युवतीची इतक्या क्रूरपणे केलेल्या हत्येची घटना माहिती समोर आल्यानंतर करपेवाडी गावात संताप पसरला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी भाग्यश्रीचे नातेवाईक करत आहेत.