मुख्य सामग्रीवर वगळा

राणीसावरगावात दर्पण दिनानिमित्य पत्रकारांचा सत्कार

श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रायमरी इंग्लिश स्कूल व उच्चप्राथमिक -माध्यमिक विद्यालय 
राणीसावरगाव येथे बाळ शास्त्री जांभेकर दर्पण दिनानिमित्य पत्रकारांचा सत्कार
करण्यात आला.
गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात दिनांक 7  जानेवारी वार सोमवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर ,सावित्रीबाई फुले व सानेगुरुजी यांच्या संयुक्तिक जयंती महोत्सवानिमित्य विद्यालयामध्ये माऊली हॉस्पिटलचे संचालक डॉ.परशुराम शिंदे साहेब व शाळेच्या वतीने  निबंध स्पर्धा वक्तृत स्पर्धा ठेवण्यात आली होती त्याचे बक्षीस वितरण, नवनिर्वाचित सरपंच सुरेशभाऊ चव्हाण,घनदाट मामा मित्रमंडळाचे जिल्हा परिषद सर्कल प्रमुख कल्याण भाऊ जाधव, माजी सरपंच हंसराज जाधव, सामाजिक कार्यकर्ते किशन वळसंगीकर व पत्रकार  माऊली जाधव  रमेश महामुने सुरेश सालमोठे यांना विद्यालयाच्या वतीने शाल श्रीफळ शामची आई हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आली. यावेळी  माऊली हॉस्पिटल चे डॉ. शिंदे यांनी आई हे पाल्याची पहिली गुरु आहे आणि आई वडिलांनी संपत्ती पेक्षा संतती संस्कारक्षम  होण्यासाठी लक्ष पुरवावे यावर प्रकाश टाकला तर जेष्ठ  पत्रकार ज्ञानेश्वर जाधव यांनी ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थाना  शिक्षण व संस्कारच्या दृष्टीने सक्षम बनवण्याचे व बालवयात इंग्रजी बोलण्यात विद्यार्थाना सक्षम बनवणारी एकमेव छत्रपती शिवाजी महाराज  विद्यालय  आहे असे    मत प्रतिपादन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी   सचिव शिवसांबजी कोरे सर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  मुख्याध्यापक  व्यंकट कदम सर तर  प्रायमरीच्या मुख्याध्यापक सौ स्वामी मॅडम यांनी सूत्रसंचालन केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सर्व शिक्षक शिक्षिका यांनी मेहनत घेतली.

टिप्पण्या