नवी दिल्ली : जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरच्या पुलवामातील अवंतीपुरा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या गाडीवर भ्याड हल्ला केला. जवानांच्या गाडीला विस्फोटकांनी भरलेल्या गाडीने धडक दिली. त्यामुळे झालेल्या स्फोटात 30 भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "जवानांचे हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही."दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यानंतर सर्व भारतीयांनी या हल्ल्याचा बदला घेतला जावा, अशी भावना व्यक्त केली आहे. सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. सर्व राजकीय नेत्यांनीदेखील घटनेचा निषेध केला, परंतु घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र व्यक्त झाले नव्हते. खूप उशीरा मोदींनी ट्वीट करत शहीदांना श्रद्धांजली वाहिली.नरेंद्र मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेला हा भ्याड हल्ला आहे. मी याचा निषेध करतो, जवानांचे हे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. आम्ही सर्व भारतीय एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून शूर शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत उभे आहोत. जखमी झालेले जवान लवकर पूर्णपणे बरे होवोत"
टिप्पण्या