मुख्य सामग्रीवर वगळा

नगराध्यक्षांच्या पतीची मुख्याधिकाऱ्याशी अरेरावी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

. पाटोदा प्रतिनिधी ➡️ हरिदास शेलार. पाटोदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष यांच्या पतीने बैठकीदरम्यान महिला मुख्याधिकारी यांच्याशी अरेरावी केल्याची घटना पाटोदा येथील नगरपंचायत कार्यालयात मंगळवारी दुपारी बारा वाजता घडली. याप्रकरणी नगराध्यक्ष पतीविरुद्ध पाटोदा पोलीस ठाण्यात प्रशासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.श्री गणेश नारायणकर असे गुन्हा दाखल झालेल्या नगराध्यक्ष पतीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार नगरपंचायत कार्यालयात बैठक सुरू होती यावेळी लिपिक विठ्ठल हे या विषयाचे वाचन करत असताना नारायणकर यांनी  मुख्याधिकारी नीलम बाबुराव कांबळे यांना जाब विचारत बोलणे सुरू केले शिवाय अपशब्द वापरले असे मुख्याधिकारी कांबळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी नगराध्यक्ष पती गणेश नारायणकर यांच्या विरोधात  गुन्हा नोंद झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  कांबळे मॅडम महिला  असतानाही शहाणपण का करता भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या ताब्यात असलेल्या पाटोदा नगरपंचायत च्या अध्यक्षापासून ते सर्व सभापती महिला तसेच शिवाय मुख्याधिकारी महिला असतानाही ते पदाधिकाऱ्यांच्या पतीचे वाढलेले वर्चस्व दिसून येत आहे असे असताना कांबळे मॅडम महिला पदाधिकाऱ्यांच्या पतीची दादागिरी सहन करत आहेत  असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे .खोटे आरोप करत गुन्हा नोंदवला मुख्याधिकारी कांबळे यांनी माझ्यावर खोटे आरोप करत गुन्हा नोंदविला असल्याचे नारायणकर यांनी म्हटले हा प्रकार कॅमेऱ्यात कैद आहे इथे दुष्काळ असताना कांबळे या सतत गैरहजर असतात नंबर खर्चाचा प्रस्ताव मान्यतेसाठी बैठकीत ठेवला होता माझी पत्नी या नगराध्यक्ष असताना नियमबाह्य खर्चाला मान्यता दिली जाणार नाही मुख्याधिकारी कांबळे यांची कसून चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे पुढील तपास पाटोदा प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक अजित कुमार करपे पुढील तपास करीत आहेत.

टिप्पण्या