मुख्य सामग्रीवर वगळा

पाटोद्यात तहसिलदाराच्या मोगलाई विरोधात आज लाक्षणिक उपोषण.रिपोर्टर :-डॉ. हरिदास शेलार

सत्य बातमी छापली म्हणून पत्रकाराला केले उभे आरोपीच्या पिंजर्‍यात
पाटोदा (प्रतिनिधी) डॉ हरिदास शेलार दि.१८ :सत्य बातमी प्रसिध्द करणं हा गुन्हा आहे का ? नाही, नक्कीच नाही, किंबहुना ते पत्रकाराचं कर्तव्यच आहे. मात्र बीड जिल्हयातील पाटोदा येथील तहसिलदार मॅडमला हे मान्य नसावं.आम्ही काही ही मनमानी केली तरी पत्रकारांनी आमच्या विरोधात काही ही लिहीता काढता कामा नये असा काही उन्मत्त अधिकार्‍यांचा तोरा असतो. पाटोद्याच्या तहसिलदार त्याच पंथातल्या दिसत आहे. पाटोदा शहरातील पाणी टंचाईची बातमी छापल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल अशी भिती दाखवत या तहसीलदार मॅडमनी थेट पत्रकार पोपट कोल्हे यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हाच दाखल केला आहे.
मराठवाड्यातील जनतेने उन्मत्त निजामाला पाणी पाजले. बीडचे पत्रकार ही तहसिलदार मॅडमची मोगलाई सहन करणार नाहीत.पत्रकारांनी सत्याचा आग्रह धरीत एक दिवसाचा सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला असून सोमवार दिनांक १८/०२/२०१९ रोजी ११=०० वाजता हे आंदोलन होत आहे. स्वतः मराठी पत्रकार परिषदेचे श्री.एस.एम.देशमुख साहेब या आंदोलनात सहभागी होऊन प्रशासनाच्या लहरी आणि मनमानी कारभारावर आसूड डब ओढणार आहेत.
तरी जिल्ह्य़ातील सर्व पत्रकार बांधवांनी बहु संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदे वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या