मुख्य सामग्रीवर वगळा

तांबाराजुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची निर्धार यात्रा नियोजन बैठक संपन्न ..:रिपोर्टर :-डॉ. हरिदास शेलार

: प्रतिनीधी
दि १८/०२/२०१९ रोजी संध्या 7 वाजता तांबाराजुरी येथे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतिने डोंगरकिन्ही जि.प गटाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात जिजाउ वंदनाने केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आष्टी, पाटोदा, शिरूर विधानसभा मतदारसंघाचे नेते बाळासाहेब आजबे काका, बीड जि.प.माजी अध्यक्ष डॉ शिवाजी राऊत,  जि.प.माजी सभापती महेंद्र तात्या गर्जे, सतिष आबा शिंदे, चंपाताई पानसंबळ ,शिवभुषण जाधव, आण्णासाहेब चौधरी,महेबुब शेख ,सज्जाद सय्यद,यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. परळी येथे 23/02/2019 रोजी होणार्या निर्धार यात्रेच्या समारोप कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.
यावेळी सुनिल काळे,अँड वाहब भाई, सुभाष अडागळे,प्रकाश सवासे ,शिवाजी नेमाने, राज घुमरे बाबासाहेब शिंदे ,मंगेश पवार,नारायण मामा ,बाळासाहेब खाडे, राहुल सोनवणे,  आविनाश पवार ,विशाल जाधव,मधुकर येवले महारुद्र येवले ,हनुमंत खोड,नवनाथ गव्हाणे,महादेव पवळ ,राजेश गोंदकर,तात्या चौरे,ज्ञानेश्वर तांबे,अमोल तांबे,शहादेव नेमाने,रामप्रसाद तांबे,सुदाम तांबे,मोहन तांबे, ईत्यादी तांबाराजुरी,चुंबळी,उंबरविहरा,
तळेपिंपळगांव,डोंगरकिन्ही तील  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिकेत तांबे सर यांनी केले,तर आभार मुरली तांबे यांनी मानले.

टिप्पण्या