मुख्य सामग्रीवर वगळा

बीडचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांची बदली.डॉ.आस्तिककुमार पांडे नवे जिल्हाधिकारी:- रिपोर्टर:- डॉ हरिदास शेलार ➡️

बीडचे जिल्हाधिकारीएम. डी. सिंह यांची बदली. डॉ आस्तिककुमार पांडे नवे जिल्हाधिकारी
 प्रतिनिधी । बीड. डॉ हरिदास शेलार ➡️
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर आयएएस ऑफीसरच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तीन वर्षांचा कालावधी उलटलेले बीडचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांची बदली करण्यात आली आहे. ते आयटीचे डायरेक्टर झाले आहेत. तर अकोल्याचे जिल्हाधिकारी डॉ. आस्तिककुमार पांडे यांची बीडच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. बीडचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांची बदली करण्यात आली असून त्यांना आयटीच्या डायरेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अकोल्याचे जिल्हाधिकारी डॉ.आस्तिककुमार पांडे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र सिताराम कुंटे यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झाले आहे. एम.डी.सिंह यांनी बीडचे जिल्हाधिकारी म्हणून अत्यंत सक्षमपणे काम केले आहे. पीक विमा भरण्यामध्ये बीड जिल्हादेशात पहिल्या स्थानी आला तर नुकताच पुनरूत्थानाच्या क्रांतीमध्येही बीड जिल्ह्याने देशात पहिला क्रमांक पटकावला. हे फलित जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांचेच आहे.

टिप्पण्या