मुख्य सामग्रीवर वगळा

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना साठी मुदतवाढ द्या -आकाश गर्जे (रिपोर्टर : हरिदास शेलार)

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना साठी मुदतवाढ द्या -आकाश गर्जे*

*मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतून हजारो शेतकरी राहणार वंचित - आकाश गर्जे*बीड प्रतिनिधी हरिदास शेलार ➡️
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतून बीड जिल्ह्यातील हजारो शेतकरी वंचित राहणार आहेत. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आव्हान केले होते परंतु शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचताच पोर्टल बंद झाले त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना इच्छा असूनही सौर कृषी पंपाचा लाभ घेता येणार नाही. थोडाफार शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले असून त्यांचे पंप मंजूर झाले आहेत तरी इतर सर्व शेतकऱ्यांची दखल घेऊन सर्वांना ऑनलाईन करण्याची संधी द्यावी. आणि महावितरण विभागाने लवकरात लवकर पोर्टल चालू करून ऑनलाइन अर्ज स्वीकारावेत.
आणि मागेल त्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ द्यावा. शेतकऱ्यांसाठी लाईट मुक्त आणि सौर उर्जेवर चालणारी मोटर अत्यंत फायदेशीर असून रात्रीचे पिकांना पाणी देणे यामुळे वाचणार असून मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांच्या खरोखर फायद्याचे आहे परंतु महावितरण विभागाने या योजनेसाठी ऑनलाईन करण्यासाठी कोणतीही मुदत दिली नव्हती त्यामुळे अचानक पोर्टल बंद झाले आणि शेतकऱ्यांची निराशा झाली त्यामुळे लवकरात लवकर ऑनलाइन पोर्टल चालू करून शेतकऱ्यांना अर्ज करण्याची मुदत वाढवावी असे आवाहन डिजिटल शासकीय योजना अंड कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आकाश गर्जे यांनी केली आहे.

टिप्पण्या