मुख्य सामग्रीवर वगळा

धनगरजवळका येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप (डॉ.हरिदास शेलार)

पाटोदा  (प्रतिनिधी )  पाटोदा तालुक्यातील धनगरजवळका येथील   श्री  जगदंबा विद्यामंदीर च्या   दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला
   सोमवार  रोजी झालेल्या निरोप  समारंभाच्या झालेल्या  कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच रामराव काळे तर पाहुणे म्हणून ह.भ.प.परशुराम मराड़े (तळेगाव बीड )तसेच श्री.  जगदंबा शिक्षण संस्थेचे संस्थापक सचीव आदरणीय  पांड़ूरंग पवार सर
    त्याचप्रमाणे उपसरपंच अभय पवार, लक्ष्मण सस्ते,  लक्ष्मण ढवळे, नानासाहेब ड़िड़ूळ, मुख्याध्यापक विकास वराट, मुख्याध्यापक सोंड़गे पंढरीनाथ ,नवनाथ काळे, शिक्षक वृन्द, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी /विद्यार्थीनी  उपस्थित होते.
   या वेळेस पुजा येवले, ड़ोके प्रतिक्षा ,योगीता काळे,पुजा गाड़ेकर,ऋतुजा काळे     इ. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच ह.भ.प.मराड़े महाराज यांनी प्रत्येक व्यक्तीच्या जिवनांत शिक्षणाला खुप महत्व आहे अगदी सोप्या भाषेत सांगितले. पी.एस पवार यांनी भावनिक होऊन आपले विचार मांड़ले तसेच लक्ष्मण सस्ते  (पालक) यांनी कुठल्याही  परीस्थितीत कसे लढायचे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले व विद्यार्थ्यांना  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी   अतुल पवार,  अशोक पवार ,कसरे नामदेव,वैजिनाथ सुरवसे, महेन्द्र आगे,कानिफनाथ पवार यांनी परीश्रम घेतले .
 कार्यक्रमाचे सुञसंचालन केशव काळे यांनी केले तर आभार पी.एस पवार सरांनी केले.

टिप्पण्या