नगर- बीड -परळी रेल्वे मार्गाचे काम लवकरात लकवकर पुर्ण करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासुन होत होती.रेल्वे जोडली गेल्यास बीड व नगर ला जाणा-या प्रवाशांची प्रवास करण्याची मोठी गैरसोय टळणार आहे. वेळोवेळी निधी मंजुर होत नसल्याने या मार्गाचे काम कित्येक वर्ष रखडले होते. या मार्गासाठी 50 टक्के निधी राज्य सरकार तर 50 टक्के निधी केंद्र सरकार देणार आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, यांनी युतीसरकार आल्यानंतर या रेल्वेमार्गाला निधी मिळुन काम पुर्णत्वाकडे नेले.अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे, खा. प्रितमताई मुंडे यांनी गेल्या पाच वर्षापासुन केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोटयावधी रुपयांचा निधी रेल्वेच्या कामासाठी खेचुन आणला आज बीड जिल्हयातील स्वप्नातील रेल्वे ही आज पुर्ण होतांना दिसुन येत आहे. नारायण डोह ते सोलापुवाडी या दरम्यान हायस्पीड इंजिनची टेस्टींग आज घेण्यात आली. टेस्टींग आज यामुळे अनेकांच्या डोळयांचे पारणे फिटले. नारायण डोह ते सोलापुरवाडी या दरम्यान हायस्पीड इंजिनची चाचणी आज घेण्यात आली.लवकरच हिरवा झेंडा फडकणार आहे. आणि जिल्हयातील जनतेच्या स्वप्नातील रेल्वे प्रकल्प पुर्ण होणार आहे. असे दिसुन येत आहे. स्व.गोपीनाथ मुंडे यांनी अहमदनगर -बीड-परळी या रेल्वे मार्गासाठी खुप मोठे प्रयत्न केले होते. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत जिल्हयाच्या पालक मंत्री तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे खा.प्रितम मुंडे यांच्या प्रयत्नाने आज रेल्वेचा प्रकल्प पुर्णत्वाच्या दृष्टीने दिसुन येत आहे. चार वर्षामध्ये केंद्र व राज्य सरकारकडून कोटयावधी रुपयांचा निधी आणून भुसंपादन पासुन आज रेल्वे टेस्टींग पर्यंत स्वत: जातीने लक्ष घालुन वेळोवेळी अधिका-यांना सुचना देवुन हे काम प्राधान्याने करण्याचे संगीतले.या कामाला आज पुर्णत्वाकडे जात असतांना दिसून येत आहे. 2019 ला रेल्वे येणार असल्याचे चित्र केंद्र सरकार आणि राज्य सरकार उभे करत असले तरी रेल्वे यावर्षी धावणे शक्य नाही.मागील काही वर्षापासुन नारायण डोह येथपर्यंत रुळ टाकण्याचे काम झाले होते. त्यानंतर आज सोमवार दि.25 फेब्रुवारी रोजी दुपारी नारायण डोह ते सोलापुरवाडी पर्यंत रेल्वेची चाचणी घेण्यात आली.यावेळी रेल्वे ची चाचणी पाहण्यासाठी आष्टी तालुक्यातील नागरिक रेल्वे येण्याच्या उत्सुकतेने मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या