मुख्य सामग्रीवर वगळा

तांबाराजुरी येथे शिवजयंती थाटात संपन्न :-पाटोदा : प्रतिनिधी डॉ हरिदास शेलार ➡️

तांबाराजुरी येथे शिवजयंती थाटात संपन्न

पाटोदा : प्रतिनिधी डॉ हरिदास शेलार ➡️

पाटोदा तालुक्यातील तांबाराजुरी येथे शिवजयंती निमित्त अतीशय चांगले,आनी दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती मार्फत तीन दिवसाचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.दि.१७/०२ रोजी मुर्ती स्थापना,व प्रख्यात शिवचरित्रकार अफसर शेख यांचे व्याख्यान झाले.
दि.१८/०२ रोजी शालेय स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
आनी आज दि.१९/०२ रोजी  भव्य दिव्य अशी मिरवणुक ,ढोल,ताशा,शालेय विद्यार्थ्यांचे लेझीम पथक,बाल जिजाउ,बालशिवबा,ची वेशभुषा साकारण्यात आली होती.

आपली मुलं लेझीम खेळतात ,हे पाहुन त्यांच्या पालक ही लेझीम वर डाव खेळले. अशा भरगच्च कार्यक्रमानंतर बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाची सुरुवात जिजाउ वंदनाने केली.व्यासपिठावर दिनकर तांबे माजी सैनिक ,नारायण तांबे माजी सैनिक,हरिदास तांबे माजी सैनिक,संदीप तांबे फौजी, ईन्नुस शेख सर,पोपट तांबे,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन दिपक तांबे सरपंच हे होते.याप्रसंगी
 राधा तांबे,योगीता तांबे,पल्लवी तांबे,आदी मुलींनी भाषणे केली ,
दिनकर तांबे माजी सैनिक ,हरिदास तांबे माजी सैनिक, यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला जि.प.शाळा तांबाराजुरी,जि.प.शाळा नेमाने वस्ती,माध्यमिक विद्यालय तांबाराजुरी चे सर्व विद्यार्थी,शिक्षक,गावातील माता-भगिनी,ग्रामस्थ,तरुन,असे सर्व स्तरातील लोंक उपस्थित होते.
शेवटी दिपक तांबे सरपंच यांनी अध्यक्षीय समारोपाचे भाषण केले,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिकेत तांबे सर,बबन पवार सर यांनी केले,तर आभार हरीदास तांबे सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समीतीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तांबे,गोपाळ तांबे,आकाश तांबे,शहादेव नेमाने,रामप्रसाद तांबे,सुदाम तांबे,अक्षय तांबे,लक्ष्मन तांबे,अमोल तांबे,बिभीषन तांबे, आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या