मुख्य सामग्रीवर वगळा

जिल्हा रुग्णालायात दिव्यांगाची प्रमाणपत्रासाठी होत असलेली हेडसांड रोखण्यासाठी आंदोलन करणार - शेख जीलानी/अशोक दगडखैर

प्रतिनीधी : - जिल्हा रुग्णालय बीड येथे दिव्यांग व्यक्तीना प्रमाणपत्र काढण्यासाठी फार मोठ्या आडचणीचा सामना करावा लागत आहे, कधी ऑनलाईन सिस्टीम बंद असते तर कधी डॉक्टर हजर नसत्तात तसेच बाहेर ऑनलाईनसाठी पाठवले जाते बाहेर ऑनलाईनसाठी ३०० रुपये घेतले जातात हा दिव्यांग व्यक्तीवर अन्याय आहे.
अंध, कर्णबधीर, मुकबधीर यांना तपासण्यासाठी मशीन उपलब्ध नाहीत असे सांगीतले जाते, पुर्ण एक डोळा निकामा आसणाऱ्या अंध व्यक्तिला टक्केवारी ३० टक्के दिली जाते तर ज्याचे फक्त एक बोट तुटले आहे त्यांना ४०ते ५० टक्के चे प्रमाणपत्र चेरीमेरी घेउन दिले जात आहे का ? आसा प्रश्न निर्मान होत आहे.

आजपर्यंत दिलेल्या सर्व दिव्यांग प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी करावी म्हणजे सर्व बोगस प्रमाणपत्रधारक हे बाहेर येतील सध्या बीड जिल्हायामध्ये बरेच शासकीय कर्मचारी हे बोगस प्रमाणपत्रावर नोकऱ्या करत आहेत तर बरेच लाभ घेत आहेत तरी संबधीत बाब ही गंभीर आहे तरी तत्काळ जिल्हा रुग्णालय होत आसलेली हेडसाळ थांबवावी तसेच समाजकल्यान कार्यालयातुन वनफोर पास काढण्यासाठी देखील बहेर ऑनलाईन साठी पाठवले जाते यातपण दिव्यांगाची लुट केली जात आहे हे सर्व थांबवा नसता योग्य प्रकारचे आंदोलन करण्यात येणार आहे आसे प्रसिध्दी पत्रकात  दिव्यांग संघर्ष समितीच्या सुरेखा खेडकर, शेख जीलानी,शेखआलमभाई,डी.एल.भालेराव,अशोक दगडखैर,उमेश धस,वैभव देशमुख,संतोष कोकाटे,आरेफ पठाण,शंकर नागरगोजे, बजरंग लांडगे,संतोष राख,पोपट पोकळे,संतोष गाडेकर,कमल भागवत,अंजना वनवे,संगीता घोलप,आशा डोरले,दत्ता कदम, हानुमंत काळुशे,शेख नदीम, आंधळे बाळू,सय्यद मतीन,अंकुश ढेरे,संदीपान नागरगोजे,भिवा डिडूळ,दिव्यांग संघर्ष समिती च्या सर्व पदाधिकारी व दिव्यांगबाधव यांनी म्हटले आहे .

टिप्पण्या