औरंगाबाद : १५ फेब्रुवारी ( दिल्ली गेट न्यूज) पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी हमल्यात ४२ जावान शहिद झाल्यावर देशभर संतापाची लाट पसरली आहे. दुपारी तीन वाजता या घटनेचा निषेध करण्यासाठी शहागंज गांधी पुतळ्यासमोर एमआयएमने पाकिस्तान मुर्दाबाद हिंदूस्थान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. अगोदर मेनबत्या लावून उपस्थित जनसमुदायाने श्रध्दांजली अर्पित केली. कार्यकर्ते यावेळी अक्रामक झाले होते. पोलीसांचा व राखीव बल तुकडी बंदोबस्तात तैनात करण्यात आले होते. देश सर्व राजकिय पक्ष देशासाठी व शत्रुंचा मुकाबला करण्यासाठी एकवटला आहे. अशे भ्याड हल्ले आता खपवून घेतले जाणार नाही. सरकारने पाकिस्तानवर हमला करून उत्तर द्यावे अशी मागणी यावेळी आमदार इम्तियाज जलील यांनी केली.
यावेळी आमदार इम्तियाज जलील, डॉ. गफ्फार कादरी, विरोधी पक्षनेते जमीर अहेमद कादरी, गटनेते नासेर सिद्दीकी, शहर अध्यक्ष समीर साजिद, जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अज्जु नाईकवाडी, आरेफ हूसेनी, अब्दुल आजीम, फेरोज खान, अब्दुल सत्तार, रफत यारखान, अक्रम शेख, अमर बीन हैदरा, सलीम सहारा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या