➡️ प्रतिनिधी. ➡️ रमाई आवास योजनेअंतर्गत बांधकाम केलेल्या घरकुलात धनादेश मिळत नसल्याच्या निषेधार्थ लोक जनशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बोंबील आंदोलन केले. तहसील कार्यालयासमोर चूल मांडून केलेल्या या आंदोलनाची चर्चा शहरात व तालुक्यात होत आहे नगरपंचायत च्या माध्यमातून रमाई आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहेत यामध्ये सोमीनाथ बन्सी जावळे यांनी या योजने मधून आपल्या घराचे काम सुरू केले यासाठी त्यांनी व्याजाने पैसे काढून घराचे काम लेंटल पर्यंत पूर्ण केले तरीदेखील या योजनेचा दुसरा हप्ता सोमीनाथ जावळे यांनी यांना मिळाला नाही. वेळोवेळी नगरपंचायत कडे पाठपुरावा करून देखील पैसे मिळत. नसल्याने अखेर त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला यावर मुख्य अधिकाऱ्यांनी जावळे यांना 25 फेब्रुवारी पर्यंत दुसरा हप्ता मिळेल. असे लेखी आश्वासन दिले मात्र या कालावधीत देखील उलटून गेला तरी अखेर त्यांना दुसरा आजचा नगरपंचायत मार्फत देण्यात आलेला नाही. म्हणून या नगरपंचायत च्या विरोधात लोकजनशक्ती पार्टी कडून पाटोदा तहसील समोर आंदोलन करण्यात आले यावेळी कार्यालयासमोरच झोपडी बांधुन चुलीवर बोंबील भाजन्यात आले. या आंदोलनात प्रामुख्याने लोक जनशक्तीचे तालुकाध्यक्ष माननीय गोरख झेंडा यांच्यासह सुनील जावळे . भूषण गायकवाड. बाळासाहेब गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते
टिप्पण्या