मुख्य सामग्रीवर वगळा

पाटोदा ग्रामीण रुग्णालयाला बीड चे सिव्हिल सर्जन डॉ अशोक थोरात यांच्या अचानक भेटीने कर्मचा-यांची धावपळ(डॉ. हरिदास शेलार)

पाटोदा ग्रामीण रुग्णालयाला बीड चे सिव्हिल सर्जन डॉ अशोक थोरात यांच्या अचानक भेटीने  कर्मचा-यांची  धावपळ

➡️पाटोदा प्रतिनिधी. काल दिनांक 3 मार्च रविवारी सायंकाळी साडेसात वाजता डॉ.थोरात यांनी अचानक भेट दिली यावेळी दवाखान्यात ड्युटीवर असलेले डाॅकटर व इतर काही कर्मचारी उपस्थित नव्हते.शिपायाने फोन केल्यावर काही वेळाने ड्युटीवर असलेले कर्मचारी आले. यावेळी डॉ अशोक थोरात यांनी दवाखान्यात अॅडमिट असलेल्या पेशंटची चौकशी करून दिलेल्या उपचारांची माहिती घेतली. एकंदरीत दवाखान्यात ड्युटीवर असलेले सर्व कर्मचारी उपस्थित नव्हते, डॉक्टरांचे सुचनेनुसार अॅडमिट पेशंटला योग्य औषधोपचार दिलेले नव्हते, पेशंटला संबंधित डाॅकटरांनी भेट दिली नाही, दवाखान्यातील अनेक बाबींच्या त्रुटी याविषयी डॉ.थोरात यांनी नाराजी व्यक्त करत सुधारणा करण्याच्या कडक सूचना दिल्या. या सरप्राइज व्हिजीट मध्ये जवळपास अर्धा तास थांबून सिव्हिल सर्जन यांनी चांगली चौकशी केली आणि अशाचप्रकारे अधूनमधून भेटी दिल्या पाहिजेत अशी दवाखान्यातील पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांनी भावना व्यक्त केल्या. शासनाच्या कायाकल्प उपक्रमातून पाटोदा ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट करण्यासाठी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.चिंचोले आणि त्यांचे सहकारी प्रयत्न करत असले तरी काही कामचुकार कर्मचारी असल्यामुळे शासनाच्या आरोग्य योजना आणि उपचारांच्या सुविधा यांचा सामान्य नागरिकांना फायदा होत नसल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
Medicine upalabdh pahije, Nuste ladies la ghabrun Kay upyog, Karmachari tr astatach. Tumhich tumchya Hospital chi Badnaami kartat tr Public ka karnaar nahit, pt serious aala Ani Dr present aslaa tari aajchi public mhante Dr navte , tyaveli tumhi Kay karal.