मुख्य सामग्रीवर वगळा

पाटोदा येथे भाजपाच्या विजयी संकल्प दिनानिमित्त आ. भिमराव धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मोटारसायकल रॅली

पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा येथे भाजपाच्या विजयी संकल्प दिनानिमित्त आ. भिमराव धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मोटारसायकल रॅली
काढण्यात आली. ही रॅली शहरातील शिवाजी चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते नगरपंचायत कार्यालयासमोर समारोप करण्यात आला. भाजपा कार्यकर्त्यांच्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते.
यावेळी भाजपाच्या तालुकाभरातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या विजयी संकल्प रॅलीत भाजपाचे तालुकाध्यक्ष ऍड. सुधीर घुमरे, मधुकर गर्जे, नवनाथ सानप, ऍड. सुशिल कौठेकर, श्रीहरी गिते, अनिल जायभाये, शाम हुले, पांडूरंग नागरगोजे, संजय कांकरिया, बाबासाहेब गर्जे, अनुरथ सानप, रणधीर जाधव यांच्यासह कार्यकर्ते दिसत आहेत.

टिप्पण्या